केवळ १९ टक्के कर्मचारीच माहितीबाबत सजग; ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चे सर्वेक्षण
देशातील विमा योजना क्षेत्रात धारकांमध्ये प्रचंड असाक्षरता असून नोकरी करणाऱ्यांपैकी केवळ १९ टक्के कर्मचारी त्याबाबत सविस्तर माहिती ठेवतात, असे आढळून आले आहे.
‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. कंपनीने आयोजित कर्मचारी लाभ उपक्रमातील सर्वेक्षणात २२५ संस्था आणि २,५०० कर्मचारी सहभागी झाले.
‘इमìजग ट्रेंड्स अंडर द क्लोक ऑफ अकाउंटेबल केअर’ हा या सर्वेक्षणाचा विषय होता. यात एकूण विम्याच्या जरूर तेवढय़ा पुरवठय़ात मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत असल्याचे उघड करण्यात आले आहे. केवळ २७ टक्के कर्मचारी याबाबतच्या गरजा ओळखून आहेत आणि ते अपुऱ्या संरक्षणामुळे अतिरिक्त पॉलिसी खरेदी करतात.
विमा रकमेच्या भंग प्रकरणात, रुग्णालयाची निवड हे एक प्रमुख कारण आहे. धोरणाच्या सर्वसाधारण प्रमाणात, कुठल्याही आजाराच्या उपचारांसाठी हॉस्पिटलच्या निवडीवर कसेलेही र्निबध नाहीत. अगदी साथीचा ताप असेल तरी, कुणीही रुग्णाला उच्च स्तरीय रुग्णालयामध्ये जाण्यापासून रोखू शकत नाही. यामुळे साध्या दवाखान्यात होणाऱ्या उपचारांपेक्षा या उपचारांमध्ये वाढ होते. ही बरीचशी वाढीव रक्कम भंग होण्यास कारणीभूत ठरते. मोठय़ा आणि निम शहरांमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. विमा कंपन्यांनी पुरवलेल्या रुग्णालयाच्या जाळे व्यतिरिक्त अन्य ठिकाणी गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त अडचणींना तोंड द्यावे लागते. निओप्लाज्मा किंवा हृदयविकारासारखे कॅन्सरशी संबंधित आजार आणि मूत्रजननमार्गाशी संबंधित आजार आदी तीन मुख्य आजारांतील गुंतागुंतीमुळे विमा भंग होतो.
निरोगीपणाचे उपक्रम, अहवालातील इतर केंद्रिबदू सांगतो की, ६८ टक्के कंपन्या या आरोग्यविषयक फायदे त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुरवतात. परंतु ५५ टक्के कर्मचाऱ्यांनाच या उपक्रमाबाबत माहिती असते. २१ टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीने आयोजिलेल्या अशा प्रकारच्या उपक्रमाची कुठलीही माहिती नसते.
कंपनीच्या आरोग्य आणि शेती विमा प्रमुख (दावे विभाग) अमित भंडारी म्हणाले की, आम्हाला या सर्वेक्षणात काही लक्षणीय गोष्टी पाहायला मिळाल्या. यात, कर्मचाऱ्यांमधील जागृती अत्यंत कमी असल्याचे आम्ही निरीक्षण केले; तसेच कंपनीने पुरवलेले आरोग्य सुरक्षा कवच त्यांच्या खर्चाशी मिळतेजुळते नाही.

सर्वेक्षणाची इतर निरीक्षणे :
* केवळ १९ टक्के कर्मचाऱ्यांना, एसआय, प्रसूती रजा, वाढ आणि इतर साध्या फायद्यांबाबत माहिती आहे.
* ८ टक्के कर्मचा-यांना, इतर ४५ टक्के कर्मचाऱ्यांपेक्षा चालू विम्याची रक्कम समाधानकारक वाटते.
* ८ टक्के कर्मचा-यांना आरोग्य विमा पॉलिसीच्या कुठल्याही फायद्याविषयी काहीही माहिती नाही.
* २१ टक्के प्रतिवाद्यांना केवळ एक फायदा आणि पॉलिसी सेवेबाबत माहिती आहे.
* ३८ टक्के प्रतिवाद्यांना उप-मर्यादेविषयी माहिती आहे, जे विम्याच्या देय रकमेतून वाढवले जातात.