उद्योग क्षेत्राची अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

अर्थसंकल्प २०१६ स्टील उद्योग

देशांतर्गत स्टील उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आयात स्टील तसेच संबंधित कच्चा माल यावर वाढीव शुल्क आकारण्याची अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय पोलाद मंत्रालयानेही अर्थखात्याकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्टील उद्योगाला पूरक असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रानेही निराशाजनक कामगिरी केली आहे. तेव्हा संबंधित स्टील उद्योगाला सावरण्यासाठी आयात स्टीलवर वाढीव शुल्क लागू केले जावे, अशी मागणी खुद्द स्टील खात्याने केली आहे.

हे शुल्क सध्याच्या १५ टक्क्य़ांवरून २५ टक्के करण्याची मागणी करतानाच यामुळे स्थानिक उत्पादनाला मागणी वाढून आर्थिक मंदीच्या गर्तेतील उद्योजकांना आधार मिळेल, अशी आशा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

स्थानिक स्टील उत्पादक कंपन्यांना यामुळे देशाच्या एकूण निर्मिती क्षेत्रात वाढ नोंदविता येईल, असेही सांगण्यात आले.

सर्व प्रकारच्या स्टील उत्पादनांवरील आयात शुल्क २५ टक्क्य़ांपर्यंत नेण्याची गरज आहे. ती यंदाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होईल, अशा विश्वास आहे. याबाबत जगातील सर्वात मोठा चीन हा उत्पादक देश सध्या मंदीच्या गर्तेत असल्याने मागणीही कमी आहे.

– दिदार सिंग, महासंचालक, फिक्की.