‘आयटी’ समूहाचा २०२१ पर्यंत पदभार राहणार
देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.
सिक्का हे आता या पदावर पुढील पाच वर्षे म्हणजे २०२१ पर्यंत कार्यरत राहतील, असे कंपनीने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराला कळविले.
सिक्का यांची यापूर्वीची मुदत २०१९ पर्यंत होती. सिक्का यांच्या नियुक्तीनंतर इन्फोसिसने गेल्या काही तिमाहीत वाढीव नफा नोंदविला आहे.
कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या समूहातील पुनरागमनानंतर इन्फोसिसमध्ये मोठय़ा प्रमाणात कर्मचारी गळती होऊ लागली होती.
ती विशाल सिक्का यांनी धुरा हाती घेताच काहीशी थोपविली गेली.
कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनपूरक योजना सिक्का यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत राबविल्या. सिक्का यांच्या रुपात कंपनीने प्रथमच समूहाबाहेरील व्यक्तीची प्रमुखपदी नियुक्ती केली होती. यापूर्वी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद हे इन्फोसिसच्या समूह सह संस्थापकांपैकी एकाकडेच असे. अथवा समूहातील कनिष्ट अधिकाऱ्याला बढती दिली जात असे.