जिल्ह्य़ातील आंबेगाव आणि उंड्री येथे कार्यरत असलेल्या अनुक्रमे अमित ब्ल्यूमफिल्ड आणि अ‍ॅस्टोनिया रॉयल तसेच कलरी आणि अ‍ॅस्टोनिया क्लासिक या चार गृहप्रकल्पांत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी विकसक अमित एंटरप्राइजेस हाऊसिंग लिमिटेडने एका अनोख्या व अभिनव योजनेची घोषणा केली आहे. खरेदीदारांना घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम भरून, खरेदीचा करार करता येईल. ज्यायोगे त्यांना बँकेकडून गृहकर्ज मिळविता येईल. घराचा ताबा घेतेसमयी खरेदीदाराचा काही कारणाने निर्णय बदलला वा घर न घेण्याचे ठरले तर त्याने भरलेल्या मूळ १० टक्के रकमेच्या दुप्पट रक्कम विकासकांकडून परत केली जाईल, अशा या योजनेची घोषणा अमित एंटरप्राइजेसचे संचालक संजीव पोटे यांनी केली. निवासासाठी किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने होणाऱ्या घर खरेदीत वेळेत ताबा न मिळणे अथवा अपेक्षित मूल्यवृद्धीचा अभाव या जोखमांची खबरदारी या योजनेने घेतली असल्याचे पोटे यांनी स्पष्ट केले.