छायाचित्रे व व्हिडीओ आदानप्रदानाचा जनमाध्यम मंच इन्स्टाग्राममार्फत जाहिरातबाजीचा फंडा विकसित राष्ट्रांमध्ये आजमावणे सुरू असताना भारतात हा प्रघात केलॉग्जकडून सुरू केला गेला आहे.
विशेषत: नेस्लेच्या मॅगी टू मिनिट्स नूडल्सवर बाजारात बंदी आल्याचा खाद्यान्न बाजारातील अन्य नूडल्स उत्पादनांनाही नकारात्मक परिणाम भोगावा लागत आहे. ही पोकळी भरून काढणारी पौष्टिक मल्टिग्रेन न्याहरी म्हणून केलॉग्ज मुसली या उत्पादनाच्या विपणनाबाबत केलॉग्जने आक्रमता दाखविली आहे. यातून इन्स्टाग्राम पोस्ट धाटणीची नवीन जाहिरात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
केलॉग्ज कंपनीचे विपणन संचालक हरप्रीत सिंग टिब यांनी याबाबत सांगितले की. या उत्पादनाच्या खास चवीचा अनुभव ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक रूपात सॅम्पलिंग कंपनीने सुरू केले असून, त्यात जवळपास १० लाख ग्राहकांना सामावले जाणार आहे.