वास्तविक अनेक गुंतवणूकदार हे ब्रोकर निवडताना केवळ एकच घटक पाहतात. ब्रोकर हा आपल्याकडून ब्रोकरेजच तर वसूल करत नाही. मात्र त्याचे तंत्र कौशल्य, वापरकर्तास्नेही मंचाचा वापर, संशोधन क्षमता आणि सेवा तसेच बाजारासोबत गुंतागुंतमुक्त संपर्क या बाबींकडे दुर्लक्ष होते. तुमच्या व्यवहाराचे गणित हे तुमचा ब्रोकर कितपत चांगला आहे आणि किती वाईट आहे यावरच बेतलेले असते. त्यामुळे एखाद्याची ब्रोकर म्हणून निवड करण्यापूर्वी थोडे संशोधन आवश्यक आहे.

वायदे बाजारातील एक मुख्य घटक म्हणजे योग्य ब्रोकर. या ब्रोकर (मध्यस्थ) ची निवड म्हणजे एखाद्या योग्य भागीदाराचा शोध घेण्यासारखे आहे. भारतीय बाजारात ३,००० हून अधिक ब्रोकिंगसंबंधी पर्याय आहेत. मग कॅश सेगमेंट असो किंवा इक्विटी डेरिवेटीव्ह, करन्सी डेरिवेटीव्ह असो किंवा डेब्ट. ब्रोकरची भूमिका गुंतवणूकदाराला बाजाराशी जोडून ठेवण्यात अतिशय महत्त्वाची ठरते. योग्य ब्रोकरची निवड ही वैयक्तिक गरजेनुसार योग्य आर्थिक गुंतवणुकीची निवड करण्याप्रमाणेच आहे.

वास्तविक अनेक गुंतवणूकदार हे ब्रोकर निवडताना केवळ एकच घटक पाहतात. ब्रोकर हा आपल्याकडून ब्रोकरेजच तर वसूल करत नाही. मात्र त्याचे तंत्र कौशल्य, वापरकर्ता—स्नेही मंचाचा वापर, संशोधन क्षमता आणि सेवा तसेच बाजारासोबत गुंतागुंत—मुक्त संपर्क या बाबींकडे दुर्लक्ष होते. तुमच्या व्यवहाराचे गणित हे तुमचा ब्रोकर कितपत चांगला आहे आणि किती वाईट आहे यावरच बेतलेले असते. त्यामुळे एखाद्याची ब्रोकर म्हणून निवड करण्यापूर्वी थोडेफार संशोधन करणे आवश्यक आहे. उत्तम ब्रोकर निवडण्यासाठी काही साकारी कल्पना येथे मांडत आहोत :

१९८० आणि १९९० च्या दशकात अनेक ब्रोकिंग कंपन्यांचा उदय झाला. कालांतराने वित्तीय सेवा उद्योग क्षेत्र वाढले. बाजाराने पुढची पायरी गाठण्यासाठी नैसर्गिक निवड केली. ट्रेडिंगच्या प्राचीन पद्धती कालबा ठरल्या. उलट आज बाजार मोठय़ा प्रमाणावर संस्थात्मक आणि अधिकाधिक प्रभावी होत आहे.

एखादा मजबूत ब्रोकर आपल्याकडे नसेल तर वैयक्तिक गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणावर अवलंबून असतात. त्यामुळे आजच्या काळात एक योग्य ब्रोकर तुमच्यासाठी केवळ थेट व्यावसायिक सेवाच आणून देन नाही तर तुम्हाला डेटाबेस, विश्लेषण, शिस्तशीर प्रक्रिया आणि फायद्याचा सौदा हा अत्याधुनिक तंत्रज्ञान मंचांवर उपलब्ध करून देतो. काही वर्षांंपूर्वी फक्त या क्षेत्रात केवळ मुरलेल्या, मात्तबर संस्थाच सर्व सेवा पुरवत असत.

व्यवहाराचा आदर्श मंच

प्रत्येक ग्राहक हा अभिनव असतो. त्यामुळे तुमच्या निरनिराळ्या गरजांप्रमाणे पर्याय उपलब्ध असणे आवश्यक ठरते. ट्रेडिंग मंचाची बांधणी आणि त्याची देखभाल यामध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावतो. यामुळे खर्चावरदेखील नियंत्रण राहते.

ब्रोकरने तुमच्या व्यवहार गरजेनुसार मंच निवडण्याची मुभा द्यावी. पूर्ण दिवस व्यवहार सुरू असल्याने सर्व शक्य सुविधा, स्वयंपूर्ण व्यवहार मंच ज्यामध्ये ब्राउजर आधारित आणि डेस्कटॉप आधारित व्यवहार सुविधा असणे क्रमप्राप्त ठरते.  यामुळे बहुविध संपत्ती पर्यायात गुंतागुंतमुक्त व्यवहार उपलब्ध होतात. आघाडीचे ब्रोकर त्यांच्या व्यवहार मंचासाठी मोठी डेटा विश्लेषणे आणि रोबो अंतर्दृष्टी देऊ  शकतात. माहितीचा आढावा घेताना बातम्या विश्लेषण, प्रतिस्पर्धक तुलना, स्क्रिनर्स आणि बरेच काही मदत उपलब्ध असते.

स्मार्टफोन्सच्या आगमनानंतर, मोबाइल अ‍ॅप्स अत्याधुनिक डेरिव्हेटिव्ह व्यवसायासाठी उपयोगात आणली जाऊ लागली. योग्य ब्रोकर डेस्क व्यवहाराची शाखा आणि कॉल व्यापार सुविधा देऊ करते. जर तुम्ही काही कारणास्तव महत्त्वपूर्ण व्यवहारांना अंमलात आणू शकत नसाल तर आपल्याकरिता संपर्क व्यवस्थापक (रिलेशनशीप मॅनेजर) उपलब्ध असतो.

बफेट यांच्यासारखे संशोधन करा

शेअर बाजार क्षेत्रात संशोधन हे तुमचे छुपे हत्यार असते. वॉरेन बफेटसारखे गुंतवणूक गुरु त्यांचा व्यापार संशोधन करून वाढवतात. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की, साधा गुंतवणूकदार एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीसारखा यशस्वी होऊ  शकत नाही. सखोल संशोधनाचे मूल्य चांगले ब्रोकर समजू शकतात. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला मिळू शकते. ज्यांच्याकडे अनुभवी विश्लेषक आहेत आणि जे प्रात्यक्षिक देऊ  शकतात अशा दलालाकडे जा. केवळ गाढा अनुभव आणि धोरणे असणारा संशोधन समूहच तुम्हाला चढ—उताराच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतो. बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन तुमचे धोके कमी करून तुम्हाला कमाल नफा मिळण्याची खात्री संशोधनामुळे मिळते.

संशोधन केलेल्या बाबींचा नीट अभ्यास करा. चांगली ब्रोकर सेंटर्स तुम्हाला आवश्यक गुंतवणुकींचा सारांश, बाजारातील अनुमान अहवाल, योग्य भविष्य आणि पर्याय (एफ अँड ओ), किफायतशीर पर्याय आणि तुमच्या मालकीच्या वस्तुंच्या यादीसारखी मालकी सेवा घरपोच पुरवते. मूलभूत संशोधनाच्या व्यतिरिक्त अल्प मुदतीच्या व्यापार संधीचा सुयोग्य वापर तांत्रिक विश्लेषणआने करता येतो. तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने ब्रोकरच्या पूर्वीच्या कामाची माहिती, चालू बाजारातील व्यापार आणि बाजारात होणारा गोंधळ याबाबतीतील माहिती देण्यासाठी ते फोन करतात का या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घ्या.

कौशल्य आणि स्वरूप

बाजारामध्ये व्यवहाराकरिता वेळेची मर्यादा येते. त्यामुळे तुमच्या ब्रोकरची यंत्रणा नियोजनानुसार कायम व्यवहार खिशात टाकणारी असणे अपेक्षित आहे. अर्थात व्यवहारात व्यत्यय येऊ शकतो.   तुमच्या ब्रोकरच्या पद्धतीची नीट माहिती करून घ्या. जर ही यंत्रणा गुंतवणुकदाराला १००% सेवा पुरवू शकत नसेल तर मग काहीच अर्थ नाही.

याशिवाय सेवेच्या दर्जाकडेदेखील लक्ष द्या. स्वत:चे खाते आणि शुल्काची चाचपणी करा. तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारे मानधन (कमिशन) लवचिक असू द्या. सूट, सवलती आणि मानांकन, एकंदर ग्राहक सेवा यांची वेळोवेळी माहिती घेत जा.

तुम्ही सुरुवातीला ब्रोकरची एक मोठी यादी तयार केलेली असेल. मात्र वरील सर्व निकष तपासल्यानंतर काही क्षुल्लकच उरतील. जर त्यातून सर्वोत्तम पर्याय निवडायचा असेल तर भांडवली बाजार नियामकतेची नियमावली तपासा हाहा. या नियमावलीचे पालन तंतोतंत करून जे व्यापारी तत्वे चोख पाळतात व ज्यांच्या जोखीम व्यवस्थापनाच्या क्षमता बळकट आहेत; त्यांचीच निवड करा.

आयुष्याचा जोडीदार निवडताना जसे संशोधन सुरू असते त्याप्रमाणे योग्य ब्रोकर शोधणेदेखील सोपे नाही; हे लक्षात असू द्या. ब्रोकर आणि ब्रोकरेज (मध्यस्थाला व्यवहारावर द्यायचे शुल्क) कसे काम करते हे तुम्हाला समजले असेल. कोणता ब्रोकर योग्य आहे ते निश्चित करा.

(लेखक रिलायन्स सिक्युरिटीजचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)