बांधा-वापरा-हस्तांतरित करा क्षेत्रातील सर्वात मोठी रस्ते विकसक कंपनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.ने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग २११ वरील सोलापूर-येडशी या १०० किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प पटकावला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपयांचा खर्च अंदाजला असून, बांधकाम ९१० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रस्ते बांधकामासाठी २९ वर्षांसाठी टोल-आकारणीला मुभा दिली गेली आहे. आयआरबीच्या आगामी दोन-तीन वर्षांत पूर्ण करावयाच्या ५,०५० कोटी खर्चाच्या