शिकवणी वर्गाची शृंखला चालविणाऱ्या कालराशुक्ला क्लासेसने नुकतीच व्यवसायाची २० वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये भारतातील शिक्षण विशेषत: खाजगी शिकवणी व्यवसाय मोठय़ा प्रमाणात बदलला असल्याचे संस्थापक आर. डी. शुक्ला यांनी यानिमित्ताने म्हटले आहे. या दृष्टीने आम्हीही शिकवणी पद्धतीत आमूलाग्र बदल केल्याचेही ते म्हणाले. कालराशुल्का क्लासेसचा नेहमीच विज्ञान शिक्षणावर भर राहिला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. १२६ विद्यार्थ्यांसह विलेपार्ले येथे दोन वर्गासह सुरुवात करणाऱ्या कालराशुक्लाच्या आजवर मुंबईत १६ शाखा झाल्या आहेत. येथे वर्षांला ५ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. कालराशुक्लाचे अन्य एक भागीदार एम. एच. कालरा यांच्या मते, विज्ञान शाखेत दर ५ ते ७ वर्षांनी अभ्यासानुरूप शिक्षण पद्धतीत बदल करावा लागतो.