10 April 2020

News Flash

किंगफिशर : निधी हेराफेरीची आता चौकशी होणार!

गेल्या दोन वर्षांपासून जमिनीवर असलेल्या विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सद्वारे अन्य कंपन्यांमध्ये पैसे वळते केल्याच्या प्रकरणाची आता गंभीर गुन्हे तपास कार्यालय चौकशी करणार आहे. याबाबत

गेल्या दोन वर्षांपासून जमिनीवर असलेल्या विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सद्वारे अन्य कंपन्यांमध्ये पैसे वळते केल्याच्या प्रकरणाची आता गंभीर गुन्हे तपास कार्यालय चौकशी करणार आहे. याबाबत तपास यंत्रणेने यूनायटेड स्पिरिट्सला सविस्तर माहितीसाठी विचारले आहे.
मल्ल्या यांच्या मालकीच्या यूनायटेड स्पिरिट्सवर सध्या ब्रिटनच्या दिआजिओचा ताबा आहे. किंगफिशरने विविध बँकांकडून घेतलेले कर्जरुपी पैसे फायद्यातील यूनायटेड स्पिरिट्समध्ये वळते केल्याचा संशय आहे. याबाबत विचारणा झाल्याचे यूनायटेड स्पिरिट्सने मुंंबई शेअर बाजाराला कळविले आहे. कंपनी तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. २०१२ पासून उड्डाणे ठप्प पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सने १६,०२३ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. कंपनीने २०१० ते २०१३ दरम्यान यूनायटेड स्पिरिट्ससह मल्ल्या यांच्या यूबी समूहातील अन्य कंपन्यांमध्येही गुंतवणूक केल्याचे मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2015 6:47 am

Web Title: kingfisher monterey fraud
Next Stories
1 म्युच्युअल फंड कंपन्यांची ‘सेबी’कडून झाडाझडती
2 चलन-अस्थिरतेनंतरही भारत-चीनदरम्यान निर्धारित ८० अब्ज डॉलरच्या व्यापाराची आशा!
3 सुविधा इन्फोसव्‍‌र्हचा संपूर्ण स्वदेशी पीओएस-प्रणाली ‘आसान पे’वर ताबा
Just Now!
X