‘डिजिटल बँकिंगच्या सध्याच्या युगात सहकारी बँकांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ याबाबत ‘लोकसत्ता’ने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या सहकारी बँकिंग परिषदेला राज्यभरातून नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसह अनेक नामवंतांची उपस्थिती होती. समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागाचे अधिकारी आणि बँकांच्या प्रतिनिधींची समिती बनवून सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार आणि शक्य ते सर्व पाठबळ देण्याच्या दिलेल्या ग्वाहीवर परिषदेला उपस्थित नागरी सहकारी बँकांच्या प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनीही विविध प्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न समजावून घेऊन परिषदेला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्लॅटिनम पार्टनर ‘अपना सहकारी बँक ’, गोल्ड पार्टनर ‘अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक’, सिल्व्हर पार्टनर ‘टीजेएसबी सहकारी बँक ’ आणि ‘बॅसिन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक’ हे होते.