22 July 2019

News Flash

‘एलआयसी’च्या अध्यक्षपदी एम. आर. कुमार

‘एलआयसी’च्या अध्यक्षपदी एम. आर. कुमार

| March 14, 2019 05:24 am

दोन व्यवस्थापकीय संचालकांच्याही नियुक्त्या

नवी दिल्ली : देशातील एकमेव सरकारी आयुर्विमा कंपनी असलेल्या ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ अर्थात ‘एलआयसी’च्या अध्यक्षपदी एम. आर. कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘बँक्स बोर्ड ब्युरो’मार्फत प्रथमच होत असलेल्या या नियुक्ती प्रक्रियेत महामंडळावरील दोन व्यवस्थापकीय संचालक पदेही भरण्यात आली आहेत. एक अध्यक्ष व चार व्यवस्थापकीय संचालक असलेल्या महामंडळाच्या संचालकपदावरील व्यक्तीची नियुक्ती यापूर्वी केंद्रीय अर्थखाते करत असे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी टी. सी. सुशील कुमार व विपिन आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एम. आर. कुमार हे सध्या महामंडळाच्या दिल्ली परिमंडळाचे व्यवस्थापक आहेत. तर टी. सी. सुशील कुमार हे हैदराबाद व विपिन आनंद हे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक आहेत.

व्ही. के. शर्मा डिसेंबर २०१८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक हेमंत भार्गव यांच्याकडे महामंडळाच्या अध्यक्षपदाचा हंगामी कार्यभार होता. भार्गव हे जुलैमध्ये निवृत्त होत आहे. तर नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या दोन व्यवस्थापकीय संचालक पदावरील उषा संगवण व सुनिता शर्मा निवृत्तीच्या मार्गावर आहेत. बी. वेणूगोपाल हे अन्य एक व्यवस्थापक संचालक येत्या मेमध्ये निवृत्त होतील.

First Published on March 14, 2019 1:01 am

Web Title: mr kumar appointed lic chairman