News Flash

‘एमसीएक्स’ला अॅसोचॅमचा पुरस्कार

केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते एमसीएक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक पी. के. सिंघल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

भारतातील क्रमांक एकचा वस्तू वायदा बाजार मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स)ने अॅसोचॅमने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या १४ व्या कमॉडिटी फ्युचर्स मार्केट समीट आणि प्रावीण्य पुरस्कार सोहळ्यात मानाचा पुरस्कार पटकावला. भारताच्या वस्तू वायदा बाजारामध्ये विविध किंमत आणि जोखीम व्यवस्थापनाचे मजबूत आणि कार्यक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल एमसीएक्सला या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते एमसीएक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक पी. के. सिंघल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गेल्या दोन वर्षांत सर्व सहभागींकडून पुन्हा सर्वाधिक पसंतीचा बाजारमंच म्हणून विश्वासार्हता कमावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना हा पुरस्कार म्हणजे यशाची पावतीच असल्याचे सिंघल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 5:38 am

Web Title: multi commodity exchange of india ltd
Next Stories
1 फुलरटन इंडिया गृहवित्त क्षेत्रात
2 ‘मेट्रो कॅश अँड कॅरी’वर राजीव मेडिरत्ता
3 क्वेस कॉर्पकडून भागविक्रीचा प्रस्ताव
Just Now!
X