भागभांडवल, ठेवी, वाटप केलेली कर्जे अशी सर्वागीण सुधारणा दर्शवीत, थकीत कर्जाच्या प्रमाणात घटीसारखा गुणात्मक प्रगती दर्शविणारी कामगिरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘द म्युनिसिपिल को-ऑप बँके’ने केली आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये बँकेने ३७.५८ कोटींचा निव्वळ नफा कमावला असून, तो आधीच्या वर्षांच्या तुलनेत ६.९७ टक्क्यांनी वाढला आहे. ठेवींमध्ये तब्बल २२.७८ टक्क्यांची वाढ होऊन त्या १,८९१.४७ कोटी रुपये झाल्या आहेत. कर्मचारी सभासदांसाठी अनेक कौतुकास्पद उपक्रम राबविणाऱ्या बँकेची ही प्रगती खूपच समाधानकारक असल्याचे बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष व पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त  केली.