जेव्हा तुम्ही एखादे ‘डाएट ड्रिंक’ विकत घेता तेव्हा कधी तुमचा अपेक्षाभंग झाला का? त्यातील साहित्ये नेहमीसारखी नसून अनारोग्यकारक आहेत म्हणून तुम्हाला हताश वाटले आहे का? तुमच्या पसंतीच्या नाममुद्रेबद्दलची एक महत्त्वाची आणि आरामदायक बाब म्हणजे सुसंगत पुरवठा. जेव्हा तुम्ही पारले जी किंवा अमूल बटर विकत घेता तेव्हा तुम्हाला पाहिजे असलेलीच चव मिळते. तर मग ही बाब म्युच्युअल फंडांच्या बाबतीत समान का नसावी? प्रामुख्याने जेव्हा गुंतवणूक म्हणजे एकल व्यवहार नसतो, तर ती असते दीर्घकालीन गुंतवणूक.

बरीच वर्षे म्युच्युअल फंडांनी परिभाषा आणि बिरुदाभोवती गोंधळ अनुभवला आहे. दोन वेगवेगळ्या निधी घराणेकरिता ‘मिड-कॅप’चा अर्थ, बँक क्षेत्राला वाहिलेले पायाभूत फंड आणि तसेच जुन्या जोखमेचे फंड आक्रमक निश्चित उत्पन्न जोखीम वाहतात. अगोदर गुंतवणूकदारासाठी ‘ट्रू-टू-लेबल’ फंड – फंड जे आपली परिभाषा स्पष्ट करतात ते जाणणे, त्यांच्यावर ठाम राहणे; त्याबाबतच्या योजनांच्या माहितीपत्रकात आणि मनाने हे अतिशय महत्त्वाचे ठरत होते. तर सध्याची नवीन योजना ‘विलिनीकरण वर्गीकरण’ ही बिरुदे परिभाषित करण्यास सा’ करतात या तत्त्वांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यायला हवे.

वचनबद्ध मालमत्ता  वर्गीकरण पाळताना

प्रत्येक फंड हा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोतील मालमत्ता वर्गीकरणानुसार असतो. मग बाजार समभाग योजनेकरिता ‘कप ड्रिवन’ असो किंवा ‘क्रेडीट’ आणि ‘फिक्स इन्कम स्कीम’करिता ‘डय़ुरेशन ड्रिवन’! तसेच प्रत्येक फंड अल्पकालीन बाजारी हालचालीतही गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलियोत मालमत्ता वर्गीकरण परिभाषेत बसतो का? अल्पकालीन फंड हा २-३ वर्षांंसाठी परिपक्वता कालावधीसाठी ठेवणे अनिवार्य असते. ज्याप्रमाणे व्याजदर खाली येतात म्हणून ४-५ वर्षांपर्यंत रक्कम ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे ‘लार्ज कॅप फंड’ भांडवली बाजारात मोठा परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात ‘स्मॉल कॅप’साठीच्या आकर्षणात अडकू नये. त्यामुळे फंडांची जोखीम रचना बदलते. नवीन ‘एसईबीआय मर्यादा फंड’ मालमत्ता वर्गीकरणा बाबत मर्यादा घालतात. लवचिक क्षेत्र प्रदान करतात. जसे की, लार्ज कॅप फंडना ८०% लार्ज कॅप सिक्युरिटी आणि पोर्टफोलियोच्या २०% लवचिक आहे. त्या लवचिक घटकांचे व्यवस्थापन फंडाच्या मालमत्ता वर्गीकरणाच्या भावनेने केले पाहिजे.

गुंतवणूक ही फंडाच्या जोखीम भावनेने असावी

‘ट्रू लेबल फंड’ हे जोखीमेच्या अधीन असतात. दोन्ही, दस्तावेजात दिल्याप्रमाणे आणि त्यात नसल्याप्रमाणे देखील! उदाहरणार्थ, ‘इक्विटी सेव्हिंग फंडा’त ‘इक्विटी’ आणि ‘डेट’ या दोन्हीचा समावेश आहे. कारण ही फंड श्रेणी जुन्या प्रकारच्या गुंतवणूकदारांकरिता देखील आहे. तर समभाग हिस्सा आक्रमक मिड कॅपसाठी असू नये. तर ‘डेट’ हिस्सा महत्त्वपूर्ण कालावधी किंवा पत म्हणून ठेवू नये. हे कदाचित वचनबद्ध वर्गीकरण अंतर्गत देता येते. अशा प्रकारची आक्रमक गुंतवणूक फंडाच्या जोखमेविरुद्ध असते.

संकल्पना आधारित फंडांमध्ये ‘रिव्हर्स प्रॉब्लेम’ असतो. समभागांमध्ये केलेली गुंतवणूक जेव्हा कठीण काळातून मार्गस्थ होते तेव्हा ती अनेकदा अनिवार्यता व संकल्पनेची जोखीम बाजूला ठेवून केलेली असते. फंड दस्तऐवज त्याची परवानगी देतील. पायाभूत फंड बँकांमध्ये गुंतवले जातात. ते जेव्हा कठीण काळातून जात असतात तेव्हा गुंतवणूकदाराकरिता ते अधिक धोकादायक ठरते. कारण जेव्हा पायाभूत सुविधा पुनरुज्जीवित होतील तेव्हा अपेक्षेच्या तुलनेत फंड कार्यक्षम ठरणार नाहीत.

‘अल्फा’ निर्मितीसाठी गुंतवणूक शैलीत प्रवाह नाही

बाजार मर्यादा श्रेणीनुसार, शैली ही निधीच्या शिक्कय़ाप्रमाणे असते आणि शैलीतील ओघामुळे म्युच्युअल फंडांमधून मिळणाऱ्या परताव्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ  शकतो. याची अनेक कारणे असू शकतात. चांगल्या परताव्याच्या हव्यासापोटी निधी व्यवस्थापक वारंवार आपले काम बदलत राहतात हे त्याचे एक मुख्य कारण आहे. किंमती वाढण्याच्या वर्षांत (बुल इअर्स) त्यांच्या कार्यपद्धतीला ते लाभदायक असल्याचे भासत राहिल्याने निधी व्यवस्थापक हे ‘शैली मागे धावणारे’ बनण्याची शक्यता असते. परंतु जर पोर्टफोलिओचे उद्दिष्ट वारंवार बदलत असल्याचे दिसून आल्यास हा एक मोठा धोका ठरू शकतो. उदाहरणार्थ, वाढीचा आलेख हा जर मूल्यापेक्षा जास्त असल्याकारणाने जर मूल्य असणाऱ्या निधी गुंतवणूक शैलीचा ओघ हा जर ‘जीएआरपी’सारखा असेल तर गुंतवणूकदाराला त्याच्या कराराप्रमाणे फायदा होत नाही.

निधी काय करतो ते स्पष्टपणे मांडा

सातत्याने ‘लेबल’चे अनुसरण करणे आणि जे आपण बोलतो तेच करणे हेच केवळ महत्त्वाचे नसून आपण जे करतो ते प्रभावीपणे बोलणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वर्तमानातील आणि संभाव्य गुंतवणूकदारांना गुंतवणूक संदर्भातील दृष्टीकोन स्पष्टपणे सांगितला गेला तरच निधी हे एक खऱ्या अर्थाने ‘लेबल’ होऊ  शकते. जेव्हा निधीच्या ‘लेबल’शी संबंधित नाव हे आपले सातत्य राखून असते आणि निधी संदर्भातील संवाद हा सुलभ परंतु अतिसुलभ नसतो तेव्हाच हे घडू शकते. भांडवली बाजारातील खरेदी-विक्री व्यवहार (आर्ब्रिटेज) आणि मिड कॅप निधी हे दोन्ही दाखल्यासाठी समभाग फंड म्हणून वर्गीकृत केले जात असले तरी त्या दोघांची उद्दिष्टे आणि त्यातील धोके यांमध्ये प्रचंड फरक आहे. आपल्या संवादातून या योजनांमधील वेगवेगळी उद्दिष्टे मांडली गेली पाहिजे.

म्युच्युअल फंड उद्योगात एक प्रचलित विधान आहे – ‘गुंतवणूक करण्यापूर्वी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.’ गुंतवणूक ही दुर्दैवाने एका वेळेची खरेदी नसते. तो एक वारंवार मिळणारा अनुभव असतो. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण कोणत्या कारणांसाठी ती करत आहोत त्याचा अनुभव आपल्या गुंतवणूक केल्यावर देखील व्हावा यासाठी जास्त खऱ्या ‘लेबल फंडां’वर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्याकडे वळणे हे अतिशय महत्त्वाचे असते.

शेवटी काय, तर जेव्हा ‘डायट ड्रिंक’ हे जर खरोखर ‘डायट’ नसेल तर त्याचा परिणाम हा त्या पाकिटावरील कमनीय बांध्यासारखा असणार नाहीच.!

(लेखिका एडेलवाईस असेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि इथे मांडण्यात आलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.)(म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे, योजना संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.)