मुंबई : किरकोळ गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड संशोधन करणाऱ्याा प्राइमइन्व्हेस्टर आपले म्युच्युअल फंडांची पतनिश्चित करणारे साधन ‘प्राइम रेटिंग्ज’ बुधवारी गुंतवणूकदारांना त्यांच्या मंचावर उपलब्ध करून दिले आहे.

‘प्राइमइन्व्हेस्टरने प्राइम रेटिंग्स’च्या माध्यमातून  किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या इतर म्युच्युअल फंड मंचांवरील पत निश्चितीच्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कंपनीने याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या साधनातून जोखीम आणि परताव्याच्या गुणोत्तराचे अधिक वैविध्यपूर्ण संयोजन वापण्यात आले आहे. हे पत निर्धारण गुंतवणुकीच्या उद्देशाने नव्हे तर फंडांच्या त्यांच्या सेबी परिभाषित प्रकारानुसार फंड गटातील फंडांची पतनिश्चित करण्याचा फायदा हे साधन गुंतवणूकदारांना देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राईमइन्व्हेस्टोर ही नुकतीच सुरू करण्यात आलेली फिनटेक कंपनी असून वैयक्तिक आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी नि:पक्षपाती, स्वतंत्र संशोधन करण्याचा प्रयत्न करत असते. कंपनी लवकरच म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, ईटीएफ, विमा, रोखे आणि इतर बचत उत्पादनांमधील संपूर्ण उत्पादनांचे नियोजन करता येईल, असा मंच उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही यानिमित्ताने देण्यात आली आहे.

प्राइमइन्व्हेस्टर ही सेवा १० नोव्हेंबर २०१९ पासून उपलब्ध करून देण्यात येणार असून श्रीकांत मीनाक्षी, भावना आचार्य आणि विद्या बाला यांनी सह-स्थापित केली आहे. त्यांना यापूर्वीचा फंड क्षेत्रातील अनुभव आहे.