02 March 2021

News Flash

बाजारात नवे काही..

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नव्या दागिन्यांची मालिका सादर करताना फोरेव्हरमार्क एन्कॉडियाने गळ्यातील आभूषणे तयार केली आहेत. डि बीर्स समूहामार्फत तयार करण्यात आलेल्या या दागिन्यांमध्ये विविध डिझाइन

| May 10, 2013 02:25 am

एन्कॉर्डियाचे दागिने कलेक्शन
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नव्या दागिन्यांची मालिका सादर करताना फोरेव्हरमार्क एन्कॉडियाने गळ्यातील आभूषणे तयार केली आहेत. डि बीर्स समूहामार्फत तयार करण्यात आलेल्या या दागिन्यांमध्ये विविध डिझाइन आणि वजनाचे दागिने सादर करण्यात आले आहेत. पातळ आणि मऊ प्रकारातील धातूच्या रूपातील हे दागिने सोनेरी, चंदेरी रंगांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये हिऱ्याचा अंतर्भावही आहे.

गजाचे हिरेजडित दागिने
तयार दागिने क्षेत्रातील श्री गणेश ज्वेलरी हाऊसच्या गजाने हिरेजडित दागिने बाजारात आणले आहेत. सध्याचा लग्नाचा मोसम लक्षात घेत कंपनीने खास दागिने तयार केले आहेत. असे करताना या दागिन्यांच्या डिझाइन्स तसेच धातूवापर प्रकारावर भर देण्यात आला आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांवर घडणावळ आकारण्यात येणार नसली तरी सोन्यातील दागिन्यांवर ९१ ते १९१ रुपये लागू होणार आहेत.

रॉयल सेलान्गोरच्या सोनेरी देवमूर्ती
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या सोमवारच्या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदी आणि भक्तिभाव यांचा मेळ साधून रॉयल सेलान्गोरने मौल्यवान धातूचा मुलामा असलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती सादर केल्या आहेत. डिव्हायनिटी कलेक्शन म्हणून सादर करण्यात आलेल्या या मूर्तीमध्ये यामध्ये श्रीकृष्ण, गणपती, लक्ष्मी आदी देवतांच्या २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या मूर्तीचा समावेश आहे. या मूर्ती २० हजार रुपयांपासून पुढे असून त्या सांताक्रूझ (पश्चिम) येथील जुहू तारा मार्गावरील रेमंडसमोर असलेल्या रॉयलच्या तसेच लोअर परेल येथील फिनिक्स मिल्स आवारातील रॉयलच्या दालनांमध्ये उपलब्ध आहेत.

ब्रॅण्डेड दागिन्यांची मालिका
नक्षत्र, डिदमस, गिली, दिया तसेच संगिनी ब्रॅण्डची विविध आभूषणे यंदाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने नव्या मालिकेत उपलब्ध झाली आहेत. बीआयएस हॉलमार्क असलेले हे दागिने सोने, चांदी तसेच हिरेजडित आहेत. १० हजार रुपयांवरील दागिन्यांच्या खरेदीवर १५ टक्क्यांपर्यंत सूटही मुहूर्ताच्या कालावधीत दिली जाणार आहे. गीतांजली समूहाद्वारे १, २, ८, १०, ५० व १०० ग्रॅम वजनातील ९९९ शुद्ध सोन्याची नाणीही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

तनिष्कच्या खरेदीवर मोफत नाणे
टाटा समूहातील तयार दागिने निर्मितीतील तनिष्कने यंदाच्या मुहूर्तासाठी प्रत्येक दागिना खरेदीवर मोफत सोन्याचे नाणे देण्याची योजना आखली आहे. तर २ लाख रुपयांवरील हिरेजडित एखादा दागिना खरेदी केल्यास १५ टक्के सूट मिळणार आहे. ही योजना १३ मेपर्यंत असेल.

ऑराचे प्लॅटिनम दागिने
देशभरातील २७ शहरांमध्ये ३६ दालने असलेल्या ऑरा या दागिने साखळी समूहाने प्लॅटिनम धातू प्रकारातील दागिने सादर केले आहेत. त्यांच्या किमती १८ हजार रुपयांपासून पुढे आहेत. यामध्ये कर्णभूषण, कंठहार आदी प्रकार आहेत. अनेक दागिन्यांमध्ये हिऱ्यांचे कोंदण आहे. या दागिन्यांबरोबर गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याचीही सुविधा असून याद्वारे दागिन्यांच्या गुणवत्तेचे मापन अधोरेखित होते.

मॅक्डोनल्ड्समध्ये भारतीय लज्जत
चवीबाबत चोखंदळ व खास आवडीनिवडी जपणाऱ्या भारतीयांसाठी काही नवीन मसालेदार पदार्थ ‘मॅक्डोनल्ड्स’ या खाद्य शृंखलेने दाखल केले आहेत. ‘पक्का भारतीय’ असे विशेषण ल्यालेल्या आणि पारंपरिक गरम मसाल्यासोबत बनविलेल्या ‘मसाला ग्रिल बर्गर’ची हीच खासियत सांगता येईल. शाकाहारी तसेच मांसाहारी अशा दोहोंच्या पसंतीस उतरेल आणि त्यांच्या जिव्हा तसेच पोट दोन्हीही तृप्त होतील, अशी बर्गरची जादू असेल, असा मॅक्डोनल्ड्सचा दावा आहे. एप्रिलपासून पश्चिम व दक्षिण भारतातील मॅक्डोनल्ड्सच्या १६० रेस्टॉरन्ट्समध्ये मसाला ग्रिल बर्गर उपलब्ध झाले आहेत.

टायटनकडून आयर्न मॅन घडय़ाळे
टायटन इंडस्ट्रीजने लहानग्यांसाठी तयार केलेल्या मनगटी घडय़ाळांचा ब्रॅण्ड झूपने माव्‍‌र्हल स्टुडियो फिचरचे ‘आयर्न मॅन थ्री’चे खास कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये मुला-मुलींसाठी विशेष आठ घडय़ाळांच्या डायल्सवर आयर्न मॅनच्या विविध छबी असतील. लाल, निळा, पिवळा आणि काळा रंगांमध्ये या घडय़ाळाचे पट्टे असतील. या प्रत्येक घडय़ाळाची किंमत रु. ८९५ इतकी असून ती सर्व वर्ल्ड ऑफ टायटन तसेच अन्य निवडक विक्री केंद्रांमध्ये उपलब्ध झाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 2:25 am

Web Title: new product launch in market
टॅग : Business News,Market
Next Stories
1 अंबरनाथमध्ये वाल्व्होलाइन कमिन्सचा वंगणनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित
2 ‘सेन्सेक्स’चा मजल-दरमजल २० हजाराला स्पर्श
3 नोकिया थकीत करभरणा : फिनलंड तडजोडीस तयार
Just Now!
X