गेल्या काही दिवसांतील भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाचा अस्वस्थ प्रवास पुन्हा एकदा तळात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली. सोमवारीही दिडशे अंश सेन्सेक्स आपटीने तर ८,४०० च्या खालच्या निफ्टी प्रवासाने पुन्हा सदृशभीती गुंतवणूकदारांच्या मनी आहे. याबाबत दोन तज्ज्ञांची मते-

धीर ही यशाची गुरूकिल्ली!
प्रलय मंडल

अमेरिका, युरोझोन आणि उदयोन्मुख बाजारपेठा यांच्यातील वाढती तफावत स्पष्ट दिसू लागली आहे. जगभर, जागतिक जीडीपीचे अंदाज ढेपाळत असल्याने विविध देशांच्या वाढीच्या दरानेही अपेक्षित झेप घेतलेली नाही. परंतु, जागतिक अर्थव्यवस्थेला केवळ २०१६ मध्ये चांगली गती मिळेल. या वाढीचे नेतृत्व उदयोन्मुख देश करतील.
उदयोन्मुख देशांमध्ये, प्रामुख्याने इफकउ समूहात (ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका); भारत हा गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक पर्याय दिसत आहे. तेलाच्या दरामध्ये घट झाल्याने रशिया आणि घटलेल्या कमोडिटी किमतींमुळे ब्राझिल तुलनेने कमकुवत दिसत आहेत. चीन पत-प्रणित गुंतवणुकीच्या सहाय्याने पुढे जायचा प्रयत्न करत आहे आणि चीनला आपल्या निर्यात व गुंतवणूक आधारित वाढीच्या धोरणातील मर्यादा जाणवत आहेत.
समभाग हा संपत्ती वर्ग केवळ भारतातच नाही, तर जगभरातही उत्तम कामगिरी करणारा एक संपत्ती वर्ग ठरला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-प्रणित एनडीए सरकारने लक्षणीय विजय मिळवल्याचा परिणाम भांडवली बाजाराने २०१४ मध्ये ३०% परतावा देण्यामध्ये दिसून आला. जगभरातील हे सर्वोत्तम उदाहरण होते. इतके उत्तम उत्पन्न मिळण्यामागे, आíथक वाढीचे चक्र पुन्हा सुरू होईल, याविषयी निर्माण झालेली मोठी अपेक्षा हे एक कारण होते.
संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार या दोन्हींकडून उत्साह वाढल्यानेही बाजारातील गतिमानता वाढली. संस्थात्मक बाबतीत, परकीय वित्तसंस्थांचा वर्चस्व होते आणि बाजारामध्ये गुंतवणुकीचा ओघ अंदाजे १५.९ अब्ज डॉलर होता. जानेवारी २०१५ मध्ये, भारतीय भांडवली बाजाराने नवी उंची गाठली. तेव्हापासून, गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री सुरू केल्यामुळे किंचित घसरण सुरू झाली, तसेच देशांतर्गत व जागतिक पातळीवरही काही आव्हाने होती.
अलिकडच्या काळात, कंपन्यांच्या आíथक कामगिरीच्या बाबतीत निराशा होत असल्याने बाजारात जरा निरुत्साह आहे. स्ट्रीटच्या अपेक्षेनुसार कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही.
या वर्षांच्या सुरुवातीला विश्लेषकांनी अंदाज केला होता की, आíथक वर्ष २०१४-१५ मधील आíथक कामगिरी २०% वाढेल, त्यानंतर हा अंदाज अंदाजे १४-१५% पर्यंत खाली आणण्यात आला. प्रत्यक्षात नोंदवलेल्या कामगिरीनुसार, उत्पन्नामध्ये केवळ ९-१०% वाढ झाली असून ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी आहे.
इतक्या वर्षांच्या अनुभवामध्ये आम्ही पाहिले आहे की, भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांच्या बाबतीत भीती, लोभ अशा भावना प्रभावी ठरतात. यामुळे ते इक्विटीतून बाहेर तरी पडतात किंवा बाजारात चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेतात. परंतु, बहुतांश गुंतवणूकदार गुंतवणुकीबाबतचे मुख्य तत्त्व विसरतात की, तुम्ही जितका अधिक काळ बाजारात गुंतवणूक कायम ठेवता तितका अधिक काळ सकारात्मक परतावा मिळण्याची शक्यता वाढते. या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतातच, ‘बाजारातील योग्य वेळ साधण्यापेक्षा बाजारात तुम्ही किती वेळ व्यतीत करता ते जास्त महत्त्वाचे आहे.
यामुळे, सर्वात मोठा प्रश्न असा आहे, एखाद्या व्यक्तीने आत्ता बाजारात गुंतवणूक करावी का? याचे उत्तर हो असे आहे. परंतु, हा निर्णय व्यक्तीच्या गुंतवणूक कालावधीवर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. एकंदर गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये इक्विटी या संपत्तीवर्गासाठी किती तरतूद करायची, हा निर्णय गुंतवणूकदाराने घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या संपत्तीवर्गात जास्तीत जास्त किती गुंतवणूक करायची ते ठरवण्यासाठी आणि आपली जोखीम क्षमता ठरवण्यासाठी तुमच्या आíथक सल्लागाराचा किंवा ‘रिलेशनशिप मॅनेजर’चा सल्ला घेतलेला उत्तम.
समभागाबाबत अतिशय सकारात्मकता आहे. दीर्घकाळामध्ये संपत्ती उभारण्यासाठी या संपत्तीवर्गाची मोठी मदत होऊ शकते. देशासाठी आणि कंपन्यांच्या कामगिरीसाठी दीर्घकालीन चित्र नक्कीच उज्ज्वल आहे.
भारत हे उत्पादनाचे केंद्र बनवण्यासाठी सरकारने वाढीला चालना देण्यासाठी आणि रोजगारनिर्मिती करण्यासाठी मोठे लक्ष्य ठेवले आहे. भारतातील वाढीचे चक्र आता एका स्थिरतेच्या टप्प्यावर पोहोचले आहे.
येथे तीन घटकांमुळे वाढीला पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे. कमोडिटी किंमतीचे अनुकूल चक्र आणि व्याजदर घटण्यासाठी अनुकूल स्थिती, तसेच सुधारणांचा रेटा. या घटकांच्या एकत्रित प्रभावामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी चांगली वाढू शकते आणि परिणामी, कंपन्यांच्या नफात्मकतेमध्ये वाढ होण्यासाठी यामुळे मदत होऊ शकते.
आíथक वर्ष २०१५-१६ च्या उत्तरार्धात उत्पन्नवाढीला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. तेलाच्या किमती आणि फेडरेटमध्ये अपेक्षित वाढ, या घटकांकडे लक्ष ठेवायला हवे.

लेखक येस बँकेच्या किरकोळ आणि व्यवसाय बँकिंग विभागाचे वरिष्ठ समूह उपाध्यक्ष आहेत.

‘ही’ बाजारातील प्रवेशाची संधी समजा..
ललित नंबियार
आजवरच्या उच्चांकावर असताना ‘करेक्शन’ आल्यावर शेअर बाजारात पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यासाठी थोडा वेळ लागू शकतो. ‘करेक्शन’ येणे स्वाभाविक होते. भांडवली बाजारात असे चित्र निर्माण होईल, असे आम्ही कितीतरी वेळा म्हटले आहे. बाजारातील अशा घडामोडींची चिंता करू नये. बाजार चक्रिय पद्धतीने सावरणार असल्याची वेळ आल्याची कल्पना असेल तर अचूक वेळ गाठणे तसे अवघड आहे. अशा वेळी, सुधारणेसोबत कदाचित पुढे वाटचाल करतील, असे समभाग कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. भारतामध्ये पशाचा ओघ येत असल्यामुळे लोक खरेदी-विक्री करत असल्याचे दिसतात. आतापर्यंत, बाजारात बहुतांश प्रमाणात भावनांवर आधारित होता आणि उत्पन्न वाढायला अद्याप सुरुवात व्हायची आहे. अशा परिस्थितीत असे चित्र निर्माण होते. याकडे गुंतवणूकदारांनी बाजारातील तेजीचा शेवट असे म्हणून पाहण्यापेक्षा केवळ बाजारात प्रवेश करण्याची संधी, असा विचार करावा. सद्यस्थितीत क्षेत्रीयदृष्टय़ा विचार करता चक्रिय पद्धतीने बाजारात सुधारणा होणार असेल तर त्याचे नेतृत्व बँका करतील. सुरुवातीला निवडक उद्योगांचेही यामध्ये योगदान असेल. हे उद्योग कदाचित सिमेंट असू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता असल्याने, रुपयाच्या मूल्यामध्ये चढ-उतार झाला तरी तुम्हाला मदत होईल, अशा काही समभागांची निवड करायला हवी. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान तसेच औषध निर्माण योग्य ठरू शकतात.

लेखक यूटीआय म्युच्युअल फंडचे कार्यकारी उपाध्यक्ष व निधी व्यवस्थापक (इक्विटी) आहेत.