पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे (पीएमसी) अध्यक्ष सरदार चरणजीतसिंग चढ्ढा यांचे सोमवार, १२ जानेवारीला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. पीएमसी बँकेच्या स्थापनेपासून ते आज तिने १०१ शाखांच्या माध्यमातून १० हजार कोटींहून अधिक केलेल्या व्यावसायिक विकासापर्यंत चढ्ढा यांचा ध्यास व मेहनत कामी आली आहे. त्यांच्या निधनाबद्दल बँकेचे कर्मचारी व ग्राहकवर्ग इतकेच नव्हे तर सहकारी बँकिंग क्षेत्रांतून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.