|| मकरंद जोशी

उद्यमशील, उद्य‘मी’ :- काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की नवीन कर तरतुदींनुसार, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जवळपास १०% कमी कर आकारण्यात येणार आहे. त्यावेळी आपण चर्चा केली की, कर व्यतिरिक्त अन्य बाबींचा विचार करून उद्योगाची/आस्थापनाची रचना करावी. या आस्थापनांमध्ये भागीदारी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे पर्याय प्रामुख्याने उपलब्ध आहेत. या पर्यायांचा विचार केल्यास काही विशेष फरक जाणवतात. काही वाचकांनी या विषयाबद्दल अधिक माहिती देण्याविषयी सुचवले. त्यानुसार यंदाचा हा लेखन प्रपंच.

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज
SBI refuses to disclose electoral bonds details
माहितीच्या अधिकारांतर्गत निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यास SBI चा नकार, कारण काय?
why Tata and Wipro want to buy Aachi Masala food company
Tata and Wipro : टाटा – विप्रो कंपनीला आची मसाला कंपनी २००० कोटी रुपयांना का खरेदी करायची आहे?

१) पारदर्शकता / गोपनीयता :

कंपनी भागधारकांचे उत्तरदायित्त्व मर्यादित असते, तर भागीदारकांच्या उत्तरदायित्त्वाला मर्यादा नसते. याचे प्रामुख्याने कारण म्हणजे कंपनी व्यवहारात पारदर्शकता आवश्यक आहे तर भागीदारी स्वरूपात पारदर्शकता आवश्यक नाही किंवा भागीदारीत गोपनीयता सांभाळली जाऊ  शकते. हा खूप मोठा फरक आहे.

२) नफ्यामधील अधिकार :

कंपनी स्वरूपात भागधारकाचे भाग भांडवलातील प्रमाणानुसार त्यांचे नफा विभागण्याचे प्रमाण ठरते; परंतु झालेला नफा भागधारकांमध्ये वितरीत करावा किंवा उद्योग वाढीसाठी उद्योगात ठेवावा याचा निर्णय संचालकांकडे असतो. भागीदारी स्वरूपात मात्र नफ्यावर फक्त भागीदाराचा अधिकार असतो. कंपनी स्वरूपात झालेला नफा भागधारकांमध्ये वितरित करावा का नाही याचा निर्णय संचालकांच्या अखत्यारित येतो.

३) उद्योग चालवण्या संबंधीचे अधिकार :

कंपनी स्वरूपात उद्योग चालवण्याचे सर्वसामान्य अधिकार संचालकांकडे असतात. हे अधिकार भागधारकांकडे नसतात. संचालक निवडण्याचे अधिकार ५०% पेक्षा जास्त भागभांडवल धारकांकडे असतात. याचा अर्थ ५०% पेक्षा अधिक भाग भांडवलधारक संचालकांची नेमणूक करू शकतात आणि ५०% पेक्षा कमी असणाऱ्या भागधारकांना आपला संचालक नेमण्याचा अधिकार नसतो. परंतु भागीदारीमध्ये प्रत्येक भागीदाराला उद्योग चालवण्याचा, व्यवहारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे (भागीदारी करारात याबद्दल अन्य तरतुदी असू शकतात).

४) आर्थिक शिस्त/मुक्त व्यवहार :

कंपनी व्यवहारात आर्थिक शिस्तीला अत्यंत महत्त्व आहे. कंपनीला कर्ज कोण देऊ शकतो? कंपनी किती कर्ज घेऊ शकते? संचालकांचे मानधन, गुंतवणूक इत्यादी सर्व आर्थिक बाबींबद्दलचे निकष कंपनी कायद्याअंतर्गत येतात आणि त्याचे पालन होणे अनिवार्य आहे. या उलट भागीदारीमध्ये भागीदारांच्या संगनमताने हे सर्व व्यवहार होऊ  शकतात. साधारणपणे उद्योजकाला आर्थिक निर्बंध रुचत नाहीत! मात्र वित्तसंस्था आणि गुंतवणुकदार या शिस्तीमुळे अधिक आश्वस्त होतात.

५) भागभांडवल उभारणी/भांडवलाची उपलब्धता :

कंपनी स्वरूपात भागभांडवल उभारणी हा एक आकर्षक पैलू आहे. आज भांडवली बाजारात जवळजवळ ५०० हून अधिक लघू आणि मध्यम उद्योजकांनी भांडवल उभारणी केली आहे. भांडवलाची उपलब्धता हा उद्योग वाढीमध्ये एक महत्वाचा पैलू आहे. भागीदारी स्वरूपापेक्षा कंपनी स्वरूपात भाग भांडवलाला अधिक तरलता शक्य आहे; त्यामुळे गुंतवणूकदार अधिक आकर्षित होतात.

६) वित्त संस्थाची भूमिका :

वित्तसंस्थेच्या दृष्टीने पाहिल्यास कंपनी स्वरूपातील उद्योगाला कर्ज देण्याकरीता अधिक कल असतो.  कंपनी स्वरूपातील आर्थिक शिस्त वित्तसंस्थांना अधिक आश्वस्त करते; परंतु ठराविक मर्यादेपुढे भागीदारीला कर्ज देताना वित्तसंस्था संकोच करतात.

अशा अनेक बाबी पाहिल्यावर असे दिसून येते की, भांडवल उभारणी, कर रचना, कर्मचारी, वित्तसंस्था या दृष्टीने कंपनी रचना सोयीची आहे. आर्थिक बाबींच्या बाबतीत भागीधारी रचनेत उद्योजकाला अधिक मुक्तता मिळते. ज्या उद्योगाला सतत गुंतवणूक लागते अशा उद्योगांना कंपनी स्वरूप सोयीचे आहे. उद्योजकांनी अशा सर्व बाबींचा सांगोपांग विचार करुन योग्य निर्णय घ्यावा.

(लेखक कंपनी सचिव आहेत.)   makarandjoshi@mmjc.in