25 April 2019

News Flash

रांका ज्वेलर्सतर्फे दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष योजना

दागिन्यांच्या घडणावळ व मजुरीत ५० टक्के सवलतही ग्राहकांना येत्या दिवाळीत देऊ करण्यात आली आहे.

‘जितके सोने, तितकी चांदी मोफत मिळवा!’
डिम्पल आणि ट्विंकल या अभिनेत्री माता-कन्या सदिच्छादूत म्हणून करारबद्ध
राज्यातील १३६ वर्षांचा विश्वासार्ह वारसा असलेली सुवर्णपेढी रांका ज्वेलर्सने आगामी दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या अभिनव योजना आणल्या आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री डिम्पल आणि त्यांच्या कन्या ट्विंकल या दोघींची पेढीच्या आभूषणांच्या सदिच्छा दूत म्हणून निवड घोषित करताना या योजना घोषणा करण्यात आली.
‘जितके सोने, तितकी चांदी मोफत मिळवा!’ अशा योजनेसह, चांदीच्या वस्तूंच्या घडणावळ व मजुरीमध्ये २५ टक्के सवलत, हिरेजडित दागिन्यांच्या घडणावळ व मजुरीत ५० टक्के सवलतही ग्राहकांना येत्या दिवाळीत देऊ करण्यात आली आहे.
तेजपाल रांका, अनिल रांका, वस्तुपाल रांका, शैलेश रांका आणि श्रेयस रांका हे तरुण शिलेदार सध्या या परंपरागत पेढीची धुरा सांभाळत आहेत. पुण्यातील औंध, बाणेरच्या ग्राहकांसाठी रांका ज्वेलर्सची १० वी शोरूम येत्या ३ डिसेंबरला डिम्पल व ट्विंकल यांच्या उपस्थितीत सुरू होत असल्याची त्यांनी घोषणा केली.

First Published on November 5, 2015 12:30 am

Web Title: ranka jewellers launch special scheme for customers in diwali
टॅग Business News