News Flash

रुपयाची १३ पैशांनी आपटी

वाढत्या महागाईविषयी भांडवली बाजाराने मोठय़ा प्रमाणात चिंता व्यक्त केली नसली तरी परकीय चलन व्यासपीठावर त्याचे परिणाम बुधवारी जाणवले. डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात तब्बल १३

| August 14, 2014 01:07 am

वाढत्या महागाईविषयी भांडवली बाजाराने मोठय़ा प्रमाणात चिंता व्यक्त केली नसली तरी परकीय चलन व्यासपीठावर त्याचे परिणाम बुधवारी जाणवले. डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात तब्बल १३ पैशांनी घसरत ६१.२१ पर्यंत घसरला. स्थानिक चलनाची आठवडय़ातील सर्वात मोठी आपटी बुधवारी नोंदविली गेली. रुपया मंगळवारी ०.१५ टक्क्यांच्या वाढीसह ६१.०८ वर होता. बुधवारची त्याची सुरुवात ६१.२९ या मोठय़ा घसरणीनेच झाली. सत्रात तो ६१.३० पर्यंत घसरला, तर व्यवहारातील त्याचा वरचा स्तर ६१.२१ हा राहिला. बुधवारची १३ पैसे ही एकाच व्यवहारातील रुपयाची आपटी ही ६ ऑगस्टनंतरची सर्वात मोठी ठरली. या दिवशी रुपया ६५ पैशांनी रोडावला होता. आगामी कालावधीत चलनाचा प्रवास ६०.८० ते ६१.८० दरम्यान असेल, असे मत व्हेरासिटी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट यांनी व्यक्त केले आहे. बुधवारच्या चलनाच्या प्रवासाबाबत, इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायजर्सचे संस्थापक अभिषेक गोयंका यांनी, जुलैमधील अपेक्षेपेक्षा अधिक महागाई दर आणि जूनमध्ये घसरलेल्या औद्योगिक उत्पादनाने परकी चलन व्यवहारातील गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2014 1:07 am

Web Title: rupee down 13 paise against us dollar
टॅग : Rupee,Us Dollar
Next Stories
1 वायू दरवाढीबाबत सप्टेंबरअखेर निर्णय
2 स्वस्तातही स्वस्त.. ‘एअर एशिया इंडिया’कडून आणखी २० टक्केभाडे कपात
3 चार वर्षांनंतर सेदान श्रेणीत टाटांची नवीन प्रस्तुती
Just Now!
X