ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्समधील नाममुद्रा सॅमसंगने नवीन इंटरॅक्टिव्ह डिजिटल डिस्प्ले ‘सॅमसंग फ्लिप’ दाखल केला आहे. व्यावसायिक बैठका आणि सादरीकरणाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपरिक फळ्याचे ‘फ्लिप’ हे बहुविध साधने आणि प्रक्रिया एकत्र आणि सुलभ करणारे डिजिटल रूप आहे.

पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या बैठकांची स्लीक, स्टायलिश डिझाइन असलेल्या फ्लिपमुळे सहयोगात्मक कार्यक्षमता वाढवली जाते. फ्लिपमुळे बैठका कोठेही व केव्हाही घेता येऊ शकतात. स्क्रीन वापरण्यासाठी टच पेनची गरज भासणार नाही आणि नोट्स हाताने पुसून टाकता येऊ शकतात. यूजर्सना लिहिण्यासाठी २० पानांपर्यंत जागा वापरता येऊ शकते आणि त्यामध्ये सहभागींना विशिष्ट टिप्पणीकडे नेण्यासाठी ‘सर्च’चा पर्यायही समाविष्ट असेल.

सॅमसंग फ्लिप हे कार्यालयीन बैठकांसाठी, व्यावसायिक-उद्योजकांसाठी उपयुक्त आहेच, शिवाय शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा बराच उपयोग होऊ शकतो, असा विश्वास सॅमसंग इंडियाचे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स एन्टरप्राइज बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष पुनीत सेठी यांनी व्यक्त केला.

एकाच वेळी अनेक यूजरना सहभागी करून घेणाऱ्या सॅमसंग फ्लिपमुळे बैठकीमध्ये सर्व आवाज आणि कल्पना स्पष्टपणे ऐकल्या जाण्याची खातरजमा होते. एकाच वेळी जास्तीत जास्त चार यूजर थेट स्क्रीनवर अभिप्राय, जोड सादर करू शकतात. बैठक संपत असताना, सॅमसंग फ्लिप डिस्प्ले मध्यवर्ती डेटाबेसमध्ये सर्व माहिती सुरक्षितपणे साठवून ठेवतो. एअरटाइट, पासवर्डवर आधारित संरक्षण व्यवस्थेमुळे बैठकीतील तपशील सुरक्षित ठेवला जातो आणि केवळ मान्यताप्राप्त यूजरना तो वापरता येऊ शकतो.