कुमारवयातच अर्थसाक्षरतेच्या श्रीगणेशासाठी कार्यरत असलेल्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज् मार्केट (एनआयएसएम)’ या भांडवली बाजाराची नियामक ‘सेबी’चे शिक्षण-प्रशिक्षणाचे अंग असलेल्या संस्थेने आता राष्ट्रीय स्वरूपाची परीक्षेची घोषणा केली आहे. या धर्तीची पहिली ‘राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यांकन चाचणी (एनसीएफई-एनफ्लॅट)’ परीक्षा जानेवारीत होऊ घातली आहे.
‘एनआयएसएम’साठी या परीक्षेचे राष्ट्रीय स्वरूपाचे आयोजन हे ‘नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन (एनसीएफई)’द्वारे केले जाणार आहे. इयत्ता आठवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली व नि:शुल्क असलेली ही परीक्षा १२ जानेवारी २०१४ रोजी एकाच दिवशी देशभरात विविध केंद्रांत होईल. वित्तीय सेवा क्षेत्राशी संलग्न ७५ प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना या परीक्षेत सोडवावी लागेल. सर्व परीक्षार्थीना सहभागाबद्दल प्रमाणपत्र, तर विशेष प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी व शाळांना आकर्षक बक्षिसेही दिली जातील. परीक्षेत सहभागासाठी शाळांमार्फत येत्या २९ नोव्हेंबपर्यंत नोंदणी केली जाणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी व परीक्षेविषयक अन्य तपशील  ँ३३स्र्://६६६.ल्ल्र२े.ूं.्रल्ल या वेबस्थळावर उपलब्ध आहे. सध्याच्या घडीला ‘एनआयएसएम’कडून देशभरात माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरतेचे धडे देणारा खास क्रमिक अभ्यासक्रम राबविला जात आहे.