24 November 2017

News Flash

जाता जाता भागविक्री..

१९ हजारापुढे असणाऱ्या भांडवली बाजाराचा लाभ घेण्याची अखेरची संधी सोडण्याच्या तयारीत अनेक कंपन्या नाहीत.

व्यापार प्रतिनिधी ,मुंबई | Updated: December 5, 2012 5:12 AM

२०१२ ची अखेर भागभांडवल उभारणीच्या स्पर्धेतून

१९ हजारापुढे असणाऱ्या भांडवली बाजाराचा लाभ घेण्याची अखेरची संधी सोडण्याच्या तयारीत अनेक कंपन्या नाहीत. २०१२ ची अखेर प्राथमिक भागविक्री प्रक्रियेतून अधिकाधिक निधी उभारून करण्यासाठी काही कंपन्या सज्ज झाल्या आहेत.
यासाठी येत्या आठवडय़ापासून २०१२ मधील सर्वात मोठी भागविक्री सुरू होत आहे. भारती एन्टरप्राईजेस समूहातील भारती इन्फ्राटेल यामाध्यमातून ४,५०० कोटी रुपये उभारत आहे. नजीकच्या वर्षांतील कोल इंडियानंतरची सर्वात मोठी भागविक्री भारती इन्फ्राटेलची असेल.
२०१० मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाने १५,१९९ कोटी रुपये उभारले होते. तर २०१२ मधील ही पहिली मोठी भागविक्री ठरेल. याच वर्षांत आतापर्यंत एमसीएक्सने ६६० कोटी रुपये उभारले होते.
आता ‘क्रेडिट अ‍ॅनालिसिस अ‍ॅण्ड रिसर्च लिमिटेड’ अर्थात केअर या भारतातील पतमानांकन संस्थेमार्फत ५४० कोटी रुपयांची भाग भांडवल उभारणी होत आहे.
पाठोपाठ पीसी ज्वेलर्सनेही यात उडी घेण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी याच क्षेत्रातील तारा ज्वेलर्सनेही भागविक्री प्रक्रिया राबविली. त्रिभुवनदासनंतर ही दुसरी कंपनी आहे.     
कंपनी        प्रक्रिया कालावधी    किंमतपट्टा        निधी उभारणी
    
भारती इन्फ्राटेल    ११ व १२ डिसेंबर    २१० ते २४० रुपये    ४,५३४ कोटी रुपये        
केअर        ७ ते १२ डिसेंबर    ७०० ते ७५० रुपये    ५४० कोटी रुपये        
पीसी ज्वेलर्स    १० ते १२ डिसेंबर    १२५ ते १३५ रुपये    ६०९ कोटी रुपये

देशभरात ३० हून अधिक तयार दागिने दालनांची साखळी चालविणाऱ्या दिल्लीस्थित पीसी ज्वेलर्स प्राथमिक समभाग विक्रीतून ६०९ कोटी रुपये उभारत आहे. समभागासाठी कंपनीने १२५ ते १३५ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून १० डिसेंबरपासून भागविक्री प्रक्रिया सुरू होईल. तीन दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी प्रती समभाग ५ रुपये सवलत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी देण्यात आली आहे. या प्रक्रियेतून कंपनीला किमान ५६४ ते कमाल ६०९ कोटी रुपये अपेक्षित आहेत. कंपनी येत्या आर्थिक वर्षांत आणखी २० दालने सुरू करणार असून यासाठी ही भागविक्री केली जात असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बलराम गर्ग यांनी मंगळवारी मुंबईत सांगितले. व्यवसाय विस्तारासाठी कंपनीला ५९८.५० कोटी रुपयांचे भांडवल गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीची नोंदणी होईल. कंपनीचे उत्तर भारतात उत्तराखंड आणि नोयडा येथे उत्पादन सुविधा आहेत.
क्रेडिट ही भारतीय पतमानांकन कंपनीही येत्या आठवडय़ात भांडवली बाजारात उतरत आहे. कंपनीची भागविक्री प्रक्रिया ११ डिसेंबर रोजी सुरू होईल. यामाध्यमातून कंपनी ७१ लाख समभाग उपलब्ध करून देईल. केअरमध्ये स्टेट बँकेसह अनेक बँक, वित्तसंस्थांचा हिस्सा आहे. या क्षेत्रातील सध्या क्रिसिल आणि इक्रा या दोन पतमानांकन संस्था भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत.     

ज्वेलरी क्षेत्र        समभाग मूल्य
श्री गणेश        रु. १२०.०५    
टीबीझेड        रु. २६१.७०
पतमानांकन क्षेत्र    समभाग मूल्य
क्रिसिल        रु.१,००६.७५
इक्रा        रु. १,४३२.१

किंगफिशरने सादर केलेल्या आगामी हवाई उड्डाणस्थितीबाबत नागरी हवाई महासंचलनालय समाधानी आहे. या कंपनीची उड्डाणे पुन्हा सुरू न झाल्यास ते एकूणच देणीदारांसाठी हानीकारक ठरेल.
– अजितसिंह,
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री (मंगळवारी दिल्लीत)

First Published on December 5, 2012 5:12 am

Web Title: sell of shares at the end of year