सकाळच्या सत्रात ऐतिहासिक उच्चांकापर्यंत झेप घेणाऱ्या शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेरीस मात्र घसरण झाली. ४१,१२०.२८ अंकांपर्यंत झेप घेणाऱ्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेरीस ४१० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा १२६ अंकांनी घसरला. शेअर बाजारात सकाळच्या सत्रात ट्रेडिगमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

सोमावारप्रमाणे मंगळवारी सकाळी पहिल्याच सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठी झेप घेतली होती.
सकाळच्या ट्रेडिगमध्ये सेन्सेक्स २३१.०५ अंकांनी उसळून ४१,१२०.२८ अंकांवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ५८.०७ अंकांनी उसळून १२,१३५.४५ अंकांवर पोहोचला होता.

काल सेन्सेक्स ५२९.४२ अंकांनी उसळून ४०८८९.२३ अंकांवर तर निफ्टी १५९.४० अंकांनी वधारुन १२०७३.८० अंकांवर बंद झाला होता. आज सेन्सेक्सनने नवी ऐतिहातिस उंची गाठली होती. येस बँक, टाटा स्टील, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. दुसऱ्या बाजूला झी एन्टरटेन्मेंट, भारती इन्फ्राटेल आणि भारती एअरटेल यांच्या शेअर्सचा दर घसरला होता.