News Flash

निर्देशांकांचा घसरणक्रम सुरूच

मंगळवारची सुरुवात निर्देशांकांतील मोठय़ा आपटीनेच झाली. दुपापर्यंत सेन्सेक्सवर घसरण दबाव राहिला.

संग्रहीत छायाचित्र

मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील हालचालींवर आधारित स्थानिक स्तरावर सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची घसरण सलग तिसऱ्या सत्रातही कायम राहिली. जागतिक स्तरावर डेल्टा प्रकारातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या धास्तीने गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचे धोरण मंगळवारीही ठेवले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५४.८९ अंश घसरणीसह ५२,१९८.५१ वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२०.३० अंश घसरणीने १५,६३२.१० वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकात जवळपास पाऊण टक्के आपटी नोंदली गेली.

मंगळवारची सुरुवात निर्देशांकांतील मोठय़ा आपटीनेच झाली. दुपापर्यंत सेन्सेक्सवर घसरण दबाव राहिला. तुलनेने उत्तरार्धात बाजार काहीसा सावरला असला तरी घसरणीनेच सत्र बंद झाले. या पडझडीने निफ्टी १५,५०० नजीक रोडावला आहे.

खनिज तेलाच्या घसरणाऱ्या आंतरराष्ट्रीय किमती तसेच परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत भक्कम रुपयाची गुंतवणूकदारांनी दखल घेतली नाही. उलट नव्याने साथप्रसारातून अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची गुंतवणूकदारांत अधिक चिंता दिसली.

मुंबई निर्देशांकातील मूल्य घसरण नोंदवणाऱ्या समभागांमध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक, ३.३२ टक्के फरकाने आपटला. टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज्, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी बँक आदीही गडगडले.

पहिल्या तिमाहीत नफ्यात दुप्पट वाढीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या एशियन पेंट्स सहा टक्क्यांनी झेपावला. अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान यूनिलिव्हर, नेस्ले मारुती सुझुकी, टीसीएस  हेही वाढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 2:44 am

Web Title: sensex drops 355 points nifty falls below 15650 zws 70
Next Stories
1 अर्थउभारी प्रगतिपथावर
2 निवृत्तिवेतन निधी ‘आयपीओ’मध्ये गुंतवण्याला लवकरच मुभा
3 करोनाकाळातील खर्च कपात, कर कपात कंपन्यांच्या पथ्यावर
Just Now!
X