News Flash

सेन्सेक्स, निफ्टी विक्रमापासून माघारी

मुंबई निर्देशांक ५२ हजारांखाली; निफ्टीत शतकी अंश आपटी

मुंबई निर्देशांक ५२ हजारांखाली; निफ्टीत शतकी अंश आपटी

मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील घसरणीला साथ देताना येथील प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी गुंतवणूकदारांची निराशा केली. वरच्या टप्प्यावरील मूल्याचा लाभ पदरात पाडून घेताना गुंतवणूकदारांनी समभागांची जोरदार विक्री केली. परिणामी सेन्सेक्स तसेच निफ्टी आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात त्यांच्या विक्रमी स्तरापासून माघारी फिरले.

सत्राच्या सुरुवातीला तेजीत असलेले दोन्ही प्रमुख निर्देशांक व्यवहार अखेरीस त्यांच्या अनोख्या टप्प्यापासून ढळले. एकाच व्यवहारातील ३३३.९३ अंश घसरणीसह सेन्सेक्स ५२ हजारांच्या खाली, ५१,९४१.६४ पर्यंत स्थिरावला. तर निफ्टी १०४.७५ अंश घसरणीमुळे १५,६३५.३५ वर येऊन थांबला. आघाडीच्या समभागांवर विक्री दबाव राहिला.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे समभाग मूल्य सर्वाधिक फरकाने, जवळपास दोन टक्क्याने आपटले. रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फिनसव्‍‌र्ह, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक, मारुती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक, बजाज ऑटोही खाली आले. तर पॉवरग्रिड, एनटीपीसी, टाटयन कंपनी, एचसीएल टेक आदी मात्र ३.४२ टक्क्यांपर्यंत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, तेल व वायू, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, औद्योगिक, वाहन निर्देशांक १.७१ टक्क्यापर्यंत घसरले. बहुपयोगी वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक काही प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचाही बाजारात परिणाम जाणवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 3:26 am

Web Title: sensex falls 53 points nifty ends below 15750 zws 70
Next Stories
1 खासगीकरणाच्या वाटेवर असणाऱ्या सरकारी बँकांमध्ये ‘व्हीआरएस’द्वारे कर्मचारी कपात शक्य
2 पंचतारांकित ‘हयात रिजन्सी’चा व्यवसाय तात्पुरता खंडित
3 लसीकरण केले असल्यास बँकांकडून ठेवींवर वाढीव व्याज
Just Now!
X