26 November 2020

News Flash

तेजी कायम!

गेल्या आठवडय़ात सुरुवातीला केवळ दोन दिवस व्यवहार झाले होते.

सेन्सेक्स २५,८०० पुढे; निफ्टी ८,००० नजीक

इन्फोसिसच्या अनपेक्षित वाढीव नफ्याच्या रूपात यंदाच्या तिमाही निकालांच्या हंगामाच्या शुभारंभाच्या जोरावर भांडवली बाजार नव्या सप्ताहाच्या प्रारंभीच स्वार झाला. एकाच व्यवहारात सोमवारी तब्बल १९० अंशांनी वाढणारा मुंबई निर्देशांक २५,८१५ च्या पुढे, गेल्या साडेतीन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर झेपावला. तर अर्धशतकाहून अधिक अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सोमवारी ८,००० नजीक स्तर अनुभवला. प्रमुख निर्देशांकातील ही गेल्या सलग चौथ्या व्यवहारातील तेजी आहे.

गेल्या आठवडय़ात सुरुवातीला केवळ दोन दिवस व्यवहार झाले होते.

शुक्रवारी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिसने ३,६०० कोटींचा नफा, ४ टक्के महसुली वाढ आणि कर्मचाऱ्यांना १२ टक्क्यांपर्यंतची वेतनवाढ जाहीर केली होती. मात्र या दिवशी रामनवमीनिमित्त बाजार बंद होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल अशा टाटा समूहातील टीसीएसनेही सोमवारच्या व्यवहार समाप्तीनंतर आपले मार्च २०१६ अखेरचे तिमाही निकाल जाहीर केले. मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या हालचालींचा परिणाम बाजारावर चांगलाच सकारात्मक झाला आहे.

महागाई, औद्योगिक उत्पादन दर, अपेक्षित चांगला मान्सून आदी अर्थव्यवस्था भक्कम होत असल्याच्या आकडय़ांवर भांडवली बाजाराचा प्रवास गेल्या काही सत्रांपासून कायम आहे. यापूर्वीच्या सलग तीन व्यवहारांतील सलग तेजीमुळे मुंबई निर्देशांकात ९५२.९१ अंश वाढ नोंदली गेली आहे. सलग १७ व्या महिन्यात घाऊक महागाई दर उणे स्थितीत राहिल्याचेही बाजारात सोमवारी स्वागत झाले.

माहिती तंत्रज्ञानाबरोबरच (+३.०९%) स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांचे मूल्यही (+४.४०%), विद्युत उपकरणे (+१.७३%) सोमवारी अधिक चमकले. इन्फोसिसचा समभाग व्यवहारात ५.७० टक्के उंचावताना १,२३८.८० या त्याच्या वर्षभराच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. तर व्यवहारानंतर तिमाही निकाल जाहीर करण्यापूर्वी टीसीएसचे समभाग मूल्य व्यवहारात २.९३ टक्क्यांनी घसरत २,५२२.४० अशा गेल्या मंगळवारच्या तुलनेत स्थिर राहिले. कंपनीला अमेरिकेत सोसावे लागलेल्या दंडाच्या नकारात्मक वृत्ताचा हा परिणाम होता.

उत्पादनांवरील सरकारचे धोक्याचे निर्देश प्रसारित करण्याविरुद्ध तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन पंधरवडाभर बंद ठेवण्याबाबत घेतलेल्या माघारीनंतर टीसीएसचा समभाग १.३३ टक्क्यांनी वाढून ३३५.३५ रुपयांवर पोहोचला.

सेन्सेक्समधील १६ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये सिप्ला, भारती एअरटेल, एचडीएफसी, ल्युपिन, एनटीपीसी, टाटा स्टील, एशियन पेंट्स, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, विप्रो, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे समभाग मूल्य २.५० टक्क्यांपर्यंत वाढले.

घसरलेल्या समभागांमध्ये हीरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, गेल, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो यांचा क्रम राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.२६ व १.११ टक्क्यांनी वाढले. प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा त्यांच्या १ जानेवारी २०१६ नंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.

महावीर जयंतीनिमित्त भांडवली बाजारात मंगळवार, १९ एप्रिल रोजी व्यवहार होणार नाहीत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इन्फोसिसचा समभाग व्यवहारात ५.७० टक्के उंचावताना १,२३८.८० या त्याच्या वर्षभराच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. तर व्यवहारानंतर तिमाही निकाल जाहीर करण्यापूर्वी टीसीएसचे समभाग मूल्य व्यवहारात २.९३ टक्क्यांनी घसरत २,५२२.४० अशा गेल्या मंगळवारच्या तुलनेत स्थिर राहिले. कंपनीला अमेरिकेत सोसावे लागलेल्या दंडाच्या नकारात्मक वृत्ताचा हा परिणाम होता.

एस अ‍ॅण्ड पी बीएसई आयटी :

११,६३२.२२ +३४९.०४ (+३.०९%)

माइंडट्री        रु. ७३१.३५ (+६.२२%)

इन्फोसिस      रु. १,२३८.८० (+५.७०%)

टेक महिंद्र      रु. ४७६.३० (+१.१९%)

एससीएल टेक   रु. २५८.३५ (+१.१६%)

विप्रो          रु. ५८९.१५ (+०.७८%)

टीसीएस        रु. २,५२२.४० (-०.९७%)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 6:02 am

Web Title: sensex hovers around 25800
टॅग Nifty
Next Stories
1 टीसीएसच्या नफ्यात तिमाहीत भरीव वाढ
2 फंड यादीतून बाहेर म्हणजे गुंतवणुकीतूनही निर्गमन, हे गैर
3 इन्फिबीम आयपीओमध्ये ११५ कोटींची गुंतवणूक
Just Now!
X