News Flash

संक्षिप्त : ‘आर्ट्स एक्स्पो’ ग्राहकोपयोगी प्रदर्शन

एकमेकांची उत्पादने आणि व्यावसायिक सेवा घेऊन मराठी नवउद्योजकांनी प्रगती साधावी ही बाब लक्षात घेऊन ‘आर्ट एक्स्पो’ या संस्थेतर्फे अभिनव उद्योग-व्यवसाय असलेल्या उद्योजकांच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे आणि

| January 22, 2013 12:01 pm

एकमेकांची उत्पादने आणि व्यावसायिक सेवा घेऊन मराठी नवउद्योजकांनी प्रगती साधावी ही बाब लक्षात घेऊन ‘आर्ट एक्स्पो’ या संस्थेतर्फे अभिनव उद्योग-व्यवसाय असलेल्या उद्योजकांच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे आणि हस्तकला सामग्रीचे प्रदर्शन योजण्यात आले आहे. येत्या २३ ते २६ जानेवारी या कालावधीत ब्राह्मण सहाय्यक संघ, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे हे प्रदर्शन भरणार आहे. ‘आर्ट एक्स्पो’तर्फे नवउद्योजक असो वा कलाकार असो त्याच्या अभिनव उत्पादने, सेवांचे तसेच कलेच्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्याची संधी नियमितपणे दिली जात आहे. यंदाच्या प्रदर्शनात नवउद्योजकांच्या उत्पादनांसह, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स, एलआयसीची सर्व उत्पादने, चांदीच्या मुलाम्याच्या भेटवस्तू, वारली चित्रकला, मेहंदीची प्रात्यक्षिके, रांगोळीच्या डिझाइन्स, रिफ्लेक्सोलॉजी मसाज, रंगीबेरंगी गोधडय़ा, काजूच्या खाद्यवस्तू, डेकोरेटिव्ह पेंट्स, नैसर्गिक मोती, जयपूरी उत्पादने, वस्त्र-प्रावरणांच्या डिझायनर, एथनिक, सिल्क, कोसा या प्रकारात आघाडीवर असलेले विक्रेते सहभागी झाले आहेत.

कोलकाता विमानतळ आधुनिकीकरणाचा प्रकल्प ‘आयटीडी’कडून पूर्ण
कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक एकात्मिक प्रवासी टर्मिनलचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. विमानतळाची प्रवासी रहदारीची क्षमता तब्बल तिपटीने वाढविणाऱ्या हा प्रकल्प आयटी सीमेंटेशन इंडिया लि. या कंपनीने आपली पालक कंपनी इटालियन-थाई डेव्हलपमेंट पब्लिक कं. लि. सह संयुक्तपणे पूर्ण केला आहे. एकूण १८०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:01 pm

Web Title: short business news 15
टॅग : Business News
Next Stories
1 सोने भडक्याला सरकारची फुंकर
2 ‘सेन्सेक्स’ला इंधन कायम
3 आयटी=आयटी : देशाबाहेर अधिकाधिक अभियंते पाठवा अन् करलाभ मिळवा!
Just Now!
X