मुंबई : टाटा स्मृती रुग्णालयाचे संशोधनात्मक अंग आणि २००१ सालापासून खारघर (नवी मुंबई) येथे कार्यरत ‘अ‍ॅक्टे्रक’ अर्थात ‘अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’ या संस्थेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या नात्याने सय्यद हुमायूं जाफरी यांनी नुकतीच प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. सह््याद्रीच्या पायथ्याशी हिरव्यागार ६० एकर क्षेत्रफळात विस्तारलेल्या आणि प्रामुख्याने कर्करोगाच्या निदानासंबंधी संशोधन कार्यात व्यस्त असलेल्या या संस्थेचे २००५ पासून ५० खाटांचे रुग्णालयही सुरू झाले आहे. त्यानंतर अ‍ॅक्टे्रक  संकुलामध्येच प्रगत व अद्ययावत यंत्रसामग्री व प्रयोगशाळेने सुसज्ज क्लिनिकल रिसर्च सेंटरही सुरू झाले आहे.