टाटा हाऊसिंगने भारतात पहिल्यांदाच फेसबुकद्वारे घरविक्रीची घोषणा केली आहे. यानुसार कंपनी तिच्या गोव्यातील गोवा पॅराडाईज प्रकल्पातील घरे या माध्यमावर उपलब्ध करून देत आहे. प्रकल्प सुरु होण्यापूर्वी त्यामध्ये घरांचे बुकींग करण्यासाठी प्रस्तावित खरेदीदारांना फेसबूकवर नावनोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांना एकमेव आमंत्रित कोड मिळेल. हा एकमेव आमंत्रित कोड वापरुन मर्यादित घरांसाठी पहिल्यांदा येईल त्याला प्राध्यान्य या तत्वानुसार ग्राहकांना नोंदणी करता येईल. गोवा पॅराडाईज नावाचा हा प्रकल्प पाच एकर परिसरात असून निवासी घरांचा प्रकल्प आहे. त्यांच्या किंमती २९ लाख रुपयांपासून पुढे आहेत. प्रकल्पाचे स्थळ दाबोलीम येथे आहे.