News Flash

टाटा मोटर्सची बैठक

कंपनीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री तसेच संचालक नसली वाडिया हे या बैठकीला उपस्थित होते.

मिस्त्रींच्या निष्कासनाबाबत निर्णय होणार

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांना अंतिम मंजुरी देण्यासाठी टाटा मोटर्सने सोमवारी बैठक बोलाविली. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. कंपनीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री तसेच संचालक नसली वाडिया हे या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत मिस्त्री यांच्यासह त्यांचे समर्थक वाडिया यांना संचालक मंडळातून दूर करण्याबाबतचा निर्णयही अपेक्षित आहे. टाटा मोटर्समध्ये मुख्य प्रवर्तक टाटा सन्सचा २६.५१ टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून यापूर्वीच निष्कासित करण्यात आले आहे. मिस्त्री यांना हटविण्यासाठी इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर यांचीही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 12:16 am

Web Title: tata motors meeting on cyrus mistry issue
Next Stories
1 आठवडय़ाची मुलाखत : शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अर्थसाक्षरता प्रसाराला वेग
2 सेन्सेक्सची ७०० अंशांची गटांगळी
3 मिस्त्रींच्या पाठीराख्यांवर आता शरसंधान!
Just Now!
X