14 October 2019

News Flash

करदात्याला अतिरिक्त माहिती पुरविणे आवश्यक

सर्व नोंदणीकृत करदात्यांना प्राप्तीकर परतावा ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे.

त्या गर्भश्रीमंताने एकाचवेळी

नवीन प्राप्तीकर परतावा अर्ज

अर्चित गुप्ता

अलीकडेच नवीन प्राप्तीकर परतावा (आयटीआर) अर्ज प्रकाशित करण्यात आले होते. या नवीन अर्जानुसार करदात्याला काही अतिरिक्त माहिती पुरविणे गरजेचे आहे. यामध्ये भारतात निवासाचा अवधी, नोंदणीकृत नसलेल्या समभागातील गुंतवणूक आणि स्थावर मालमत्तेच्या विक्रीत विक्रेत्याने भांडवली लाभ प्राप्त केला असल्यास मालमत्ता खरेदी करणाऱ्याचे तपशील यांचा समावेश आहे.

आयटीआर-१ मधील बदल :

आयटीआर-१ अर्ज हा निवासी व्यक्तींना लागू होतो. कंपनीचा संचालक किंवा नोंदणी नसलेल्या समभागाचा धारक हे त्यास अपवाद आहेत. एकंदर उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त होता कामा नये. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ४०,००० रुपये प्रमाणित वजावटीचा दावा करण्यासाठी एक अतिरिक्त ओळ देण्यात आलेली आहे.

करदात्याने उत्पन्नवार तपशील देणे देखील आवश्यक आहे. जसे की, बचत खाते, बँक ठेवी, प्राप्तीकर परतावा, कुटुंब निवृत्ती वेतन उत्पन्न आणि नवीन आयटीआर-१ मधील ‘इतर स्रोतांकडून उत्पन्न’ या रकान्यातील इतर उत्पन्नावरील व्याजाचे उत्पन्न – भत्ते, आंशिक किंवा संपूर्णपणे कर सूट असेल – तर त्यांची रक्कम आयटीआर-१ मध्ये स्वतंत्रपणे लिहावी लागेल.

आयटीआर-२ मधील बदल :

अशा व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबे ज्यांना व्यवसाय किंवा व्यवसायातून नफा अथवा प्राप्ती होत नसेल ते आयटीआर-२ अर्ज भरू शकतात.

नवीन सूचित आयटीआर-२ अर्जानुसार, करदात्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी त्यांची निवासी स्थिती नमूद करावी लागेल. एखादी व्यक्ती प्राप्तीकराच्या उद्देशाने या वषात एक निवासी, सामान्य निवासी किंवा बिन-निवासी मानला जाईल. निवासी स्थितीच्या पुष्टीसाठी भारतात किती दिवस हजर होते याची आकडेवारी देखील तपशीलवार देणे आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त, ८०जी तक्क्य़ामध्ये रोख आणि योगदानाच्या इतर प्रकारांमध्ये रकमेची विभागणी करावी लागेल.

आयटीआर-४ मधील बदल :

ज्या करदात्यांचे एकंदर उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे आणि जे भारताचे निवासी किंवा सामान्य निवासी आहेत ते आयटीआर-४ अर्ज भरू शकतात. असे संचालक किंवा इतर कुणीही ज्यांच्याकडे २०१८-१९ वर्षांदरम्यान केव्हाही भांडवली बाजारात सूचिबद्ध नसलेले समभाग होते ते आता आयटीआर-४ मध्ये विवपरणपत्र भरू शकणार नाहीत. त्यांना आयटीआर-३ फॉर्म फाइल करावा लागेल.

जे करदाते माल वाहतूक आदी व्यवसाय करतात आणि ज्यांनी ‘प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन स्कीम’ (कलम ४४एइ) निवडली आहे त्यांना आताआयटीआर-४ मध्ये काही तपशील पुरवावे लागतील. माल वाहतूक नोंदणी क्रमांक, ते वाहन मालकीचे आहे/भाडय़ाने दिले आहे/भाडय़ाने घेतले आहे का, त्याची वहन क्षमता (मॅट्रिक टनमध्ये) आदी.

या बदलांव्यतिरिक्त फक्त त्याच करदात्यांसाठी कागदपत्रे जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे ज्यांचे वय ८० वर्षांंपेक्षा जास्त असून जे आयटीआर-१ किंवा आयटीआर-४ मध्ये कर विवरणपत्र भरतात करतात. इतर सर्वाना अनिवार्यपणे आपले विवरणपत्र ऑनलाइन दाखल करावे लागेल. तसेच आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या विवरणपत्रापासून ५ लाख रुपयांखाली उत्पन्न असणारे करदाते, ज्यांना परताव्याची अपेक्षा आहे अशांनी आयटीआर प्रत्यक्षरूपात भरून चालणार नाही.

नवीन आयकर परतावा  कसा भरावा :

सर्व नोंदणीकृत करदात्यांना प्राप्तीकर परतावा ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे. फक्त वय वर्ष ८० पेक्षा अधिक वयाचे करदाते ज्यांचे व्यवसायातून काही उत्पन्न नाही, त्यांचा यात अपवाद आहे.

करदाते त्यांना लागू असेल, त्याप्रमाणे आयटीआर-१ आणि आयटीआर-४ दाखल करण्यास सुरुवात करू शकतात. आधारसाठी जे पात्र आहेत त्यांचे आधार आणि पॅन जोडणी केलेले असणे आवश्यक आहे. काहीच दिवसात नियोक्ते अर्ज १६ देतील. त्यांनंतर करदाते केवळ अर्ज १६ सादर करून वर्ष २०१८-१९ चे विवरणपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील.

(लेखक ‘क्लिअरटॅक्स’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

First Published on May 16, 2019 1:31 am

Web Title: taxpayer needs to provide additional information on new income tax refund application