उत्पन्नाची मुख्य मात्रा असलेल्या चलनात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका टाटा समूहातील माहिती तंत्रज्ञान कंपनीला बसला आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील किरकोळ वाढ नोंदविली असली तरी डॉलर आणि रुपयातील महसुलाचा प्रतिसाद संमिश्र राहिला आहे.

२०१६-१७ च्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांच्या हंगामाचा नारळ टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने गुरुवारी फोडला. भांडवली बाजाराचे व्यवहार संपुष्टात आल्यानंतर जाहीर झालेल्या या निष्कर्षांमध्ये कंपनीने निव्वळ नफ्यातील अवघी ४.३ टक्के वाढ (६,५८६ कोटी रुपये) नोंदविली आहे.