राज्यातील विमानतळाजवळच्या उद्योग उभारणीसाठी देण्यात आलेल्या जमिनी विनावापर पडून असतील, तर त्या परत घ्याव्यात. त्यासाठी धोरण निश्चित करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्या.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी संत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव आदी उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
रोजगार निर्मिती
मिहान प्रकल्प क्षेत्रात आयटी टाऊनशिप करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, स्थानिकांना प्राधान्याने रोजगार मिळेल, याचे नियोजन करावे, शिर्डी येथे विमानतळ परिसराचा विकास करण्यात यावा, यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.