09 March 2021

News Flash

टाटा सन्सवर वेणू श्रीनिवास, अजय पिरामल यांची नियुक्ती

अनेक बडय़ा उद्योगपतींना संचालक मंडळात स्थान देण्याची टाटा समूहाने आजवर प्रथा पाळली आहे.

विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा विस्तार साधताना, त्यावर दोन ज्येष्ठ उद्योगपतींची नव्याने वर्णी लागली आहे.
पिरामल त्याचप्रमाणे श्रीराम समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल त्याचप्रमाणे टीव्हीएस मोटरचे अध्यक्ष वेणू श्रीनिवास यांची टाटा सन्सचे बिगर-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती होत असल्याचे गुरुवारी सायंकाळी उशिराने जाहीर करण्यात आले. विविधांगी ज्ञान, तज्ज्ञता व अनुभवाला प्रतिनिधित्व देणारे व्यापक रूप टाटा सन्सचे संपूर्ण संचालक मंडळाने आजवर जपले आहे. नव्या विस्तारासह आठ सदस्यीय बनलेल्या संचालक मंडळातील अन्य सदस्यांमध्ये अध्यक्ष म्हणून सायरस पी. मिस्त्री यांच्याबरोबरीने हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता नितीन नोहरिया, माजी संरक्षण सचिव म्हणून कारकीर्द राहिलेले विजय सिंग, भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत रोनेन सेन, फरिदा खंबाटा, व्होल्टास व टाटा स्कायचे अध्यक्ष इशात हुसैन यांचा समावेश आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योगधुरिणांच्या अनुभव आणि तज्ज्ञतेचा लाभ मिळावा या उद्देशाने अनेक बडय़ा उद्योगपतींना संचालक मंडळात स्थान देण्याची टाटा समूहाने आजवर प्रथा पाळली आहे. आदित्य विक्रम बिर्ला हे कैक वर्षे टाटा स्टीलच्या संचालकपदी होते. त्याच्या पश्चात त्यांचे सुपुत्र कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे ती धुरा आली. बॉम्बे डाइंगचे नस्ली वाडिया हे आजही टाटा स्टीलचे बिगर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 12:52 am

Web Title: venu srinivasan and ajay piramal appointed tata sons directors
Next Stories
1 नवीन वायदापूर्ती मालिकेची सावध सुरुवात
2 आभूषण निर्यातीत वाढ
3 उद्योगविश्वाच्या मदतीने एक हजार खेडय़ांचा कायापालट!
Just Now!
X