News Flash

अस्थिरतेचा फंडांना फटका

एप्रिलमध्ये समभाग गुंतवणुकीत २० टक्क्यांची घट

संग्रहित छायाचित्र

करोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या बाजारातील अस्थिरतेचा परिणाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर झाला आहे. एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडांच्या समभाग योजनांमधील आवक मार्चच्या ११,७२३ कोटींच्या तुलनेत २० टक्क्यांनी घसरत ६,२१२ कोटी झाली.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’ने (अ‍ॅम्फी) एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर केली. एप्रिल महिन्यांतील आकडेवारीत घसरण झाली असली तरी गेल्या १२ महिन्यांचा विचार केल्यास म्युच्युअल फंडांच्या समभाग योजनांमधील आवक ३४ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनातील एकूण मालमत्ता मार्च महिन्यांतील २२.२६ लाख कोटींवरून ७.५ टक्क्यांनी वाढ नोंदवत एप्रिल २०२० मध्ये २३.९३ लाख कोटींवर पोहोचली आहे. म्युच्युअल फंडातील मार्च महिन्यांतील २.१२ लाख कोटींच्या निर्गुतवणुकीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात ४५.९९ हजार कोटी गुंतविण्यात आले.

बाजार घसरण आणि नव्याने होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याने मार्च महिन्यातील समभाग मालमत्ता ६.५ लाख कोटींवरून कमी होत एप्रिलमध्ये ६.१ लाख कोटींवर आली आहे. एकूण समभाग मालमत्तेपैकी एसआयपीमार्फत आलेल्या मार्चमधील २.३९ लाख कोटींच्या मालमत्तेत वाढ होत एप्रिल महिन्यात २.७५ लाख कोटींवर पोहचली आहे. अ‍ॅम्फीच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२० पर्यंतच्या एसआयपी खात्यांच्या संख्येत ३.११ कोटींवरून एप्रिल महिन्यात ३.१३ कोटींवर पोहोचली आहे. एप्रिल २०२० मधील व्यवस्थापनाखालील मालमत्तेत एसआयपीच्या योगदानात घट होऊन मार्चमधील ८,६४१ कोटींवरून एप्रिलमध्ये ८,३७६ कोटींवर आली आहे. एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांची पसंती लार्ज कॅप, मल्टी कॅप आणि ईएलएसएस फंडांना लाभल्याचे आकडेवारीत समोर आले आहे. एप्रिल महिन्यात १,६९१ कोटी लार्ज कॅप फंडात, १,२४० कोटी मल्टी कॅप फंडात तर ७५२ कोटी ईएलएसएस फंडात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:12 am

Web Title: volatility hits funds abn 97
Next Stories
1 ‘हिरव्या क्षेत्रा’त ‘शॉपिंग सेंटर’ सुरू करण्याची मागणी
2 घसरण कायम
3 ‘कर्ज घेता का कर्ज’
Just Now!
X