बडय़ा शहरांत गाडय़ांची संख्या जास्त तर प्रशिक्षित चालकांची वानवा अशी स्थिती लक्षात घेऊन, वाजवी दरात मागणीनुसार सुसंस्कृत, प्रशिक्षित चालकांचा वाजवी दरात पुरवठा करणारे माध्यम ‘झुवेर’ या मोबाइल अ‍ॅपच्या रूपात प्रस्तुत झाले आहे. अलीकडेच या सेवेचे मुंबईत समारंभपूर्वक अनावरण झाले. तंत्रज्ञानाचा वापर हे या सेवेचे वैशिष्टय़ असल्याने मागणी नोंदविलेल्या ग्राहकांकडे केवळ ३० मिनिटांत चालक धाडला जाण्याइतक्या तत्परतेचा दावा झुवेरचे सहसंस्थापक सोवीन हेगडे यांनी केला आहे. प्रशिक्षण घेतलेल्या, विनयशीलता, शिष्टाचाराची तालीम दिलेल्या चालकांचा ताफा तयार करून विश्वासार्ह सेवेचा झुवेरकडून वस्तुपाठ रचला जाईल, असेही त्यांनी सांगितले.