दक्षिण आफ्रिकेत सलग सहा वर्षे राखलेले स्थान लयाला
जागतिक स्तरावरील पोलादाच्या किमतीतील घसरण, परिणामी भांडवली बाजारात रोडावलेले समभाग मूल्य यांचा फटका अनिवासी भारतीय व ‘स्टील आयकॉन’ लक्ष्मीनिवास मित्तल यांना बसला आहे. अर्सेलर मित्तलच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेत सलग सहा वर्षे श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थानी राहणारे मित्तल यंदा तेथील अव्वल १०० श्रीमंत उद्योगपतींच्या यादीच्याही बाहेर फेकले गेले आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या १०० श्रीमंतांच्या यादीत मित्तल हे २००६ ते २०११ दरम्यान अव्वल स्थानी राहिले आहेत. तर २०१२ मध्ये त्यांचे स्थान घसरून तिसऱ्या क्रमांकावर आले. २०१३ व २०१४ मध्ये ते अनुक्रमे नवव्या व १३ क्रमांकावर गेले होते. तर ‘संडे टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या ताज्या यादीत मित्तल गायबच झाले आहेत. ख्रिस्तो विज हे ६.८ अब्ज डॉलरसह आठ विविध कंपन्यांचे मालक असलेले यादीत वरच्या स्थानावर आहेत.
मित्तल यांचा प्रमुख व्यवसाय असलेल्या पोलादांची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरत आहे. तसेच कंपनीचा (अर्सेलरमित्तल साऊथ आफ्रिका लिमिटेड) स्थानिक – जोहान्सबर्ग सिक्युरिटी बाजारात सूचिबद्ध असलेला समभागही मूल्यऱ्हास नोंदवीत आहे. मित्तल यांनी दक्षिण आफ्रिका सरकारकडे २०१५ च्या सुरुवातीला अर्थसाहाय्याची मागणीही केली होती.

Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की