प्रतिकूल परिस्थितीतही लेखापरीक्षक (सीए) परिक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या कोल्हापूरच्या धनश्री तोडकर हिला सहकार क्षेत्रातील ठाणे जनता बँकने सोमवारपासून रुजू करून घेतले. कोल्हापूर येथे झालेल्या दोन दिवसांच्या ‘ग्रीन सेफ प्रॅक्टिसेस’ या परिषदेत ‘टीजेएसबी’चे उपाध्यक्ष भालचंद्र दाते व मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश उतेकर यांच्या हस्ते धनश्रीला नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. धनश्रीचे वडिल कोल्हापूर येथे चहाची गाडी चालवितात. २५० चौरस फूट आकाराच्या घरात आपल्या सहा भावंडांसह राहणाऱ्या धनश्रीने इयत्ता बारावीतही मंडळात येण्याचे यश राखले होते. तर वाणिज्य शाखेतील स्नातक परिक्षेत (बी.कॉम) ती विद्यापीठात अव्वल होती. लेखापरीक्षेत देशातून पहिली आलेल्या प्रेमा जयाकुमार हिला काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीयीकृत इंडियन बँकेने थेट व्यवस्थापकपदी नियुक्त केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ca exams first from maharashtra dhhanashri todankar is in service of tjsb bank
First published on: 12-02-2013 at 03:37 IST