नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांतील सरलेल्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) सात लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारच्या कर संकलनात वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू वर्षांत एप्रिल ते जून २०२२ या दरम्यान अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून ३.४४ लाख कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत आला असून, गत वर्षांच्या तुलनेत त्यात ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच व्यक्तिगत प्राप्तिकर, कंपनी कर, संपत्ती कर आदींचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष कराचे सरकारचे संकलन सरलेल्या तिमाहीत दुहेरी अंकाने वाढले आहे. एप्रिल ते जून दरम्यान प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत ४१ टक्क्यांनी वाढून ३.५५ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

Web Title: Centre collected rs 7 lakh crore as net taxes in april to june zws
First published on: 26-07-2022 at 03:19 IST