कोळसा आधीच दुर्भिक्ष्य त्यात ‘गारठा’!

उत्तर भारतात गेल्या ४४ वर्षांतील सर्वात कडाक्याच्या थंड हवामानामुळे यंदाच्या जानेवारीत आयातीत कोळशाची मागणी आणखीच वाढली आहे. २०११-१२ सालात मुख्यत: वीजनिर्मितीसाठी भारतात १०.३० कोटी टन कोळशाची आयात केली जी आधीच्या वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

उत्तर भारतात गेल्या ४४ वर्षांतील सर्वात कडाक्याच्या थंड हवामानामुळे  यंदाच्या जानेवारीत आयातीत कोळशाची मागणी आणखीच वाढली आहे. २०११-१२ सालात मुख्यत: वीजनिर्मितीसाठी भारतात १०.३० कोटी टन कोळशाची आयात केली जी आधीच्या वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. तर देशांतर्गत उत्पादनात जेमतेम ७ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ऑक्टोबर २०१२ पासूनच कोळसा आयातीला जोर चढला असला तरी देशातील अनेक औष्णिक ऊर्जा प्रकल्प पुरेशा कोळशाअभावी बंद ठेवावे लागल्याचे चित्र दिसत आहे. कोळशाच्या या दुर्भिक्षाच्या समस्येत कमालीच्या वाढलेला हवामानातील आणि धोरणकर्त्यांमधील गारठा भर घालणारा ठरत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coal shortage noth india as cold