डॉलरच्या तुलनेतील स्थानिक चलनातील घसरण विस्तारित होत असून मंगळवारी तो कालच्या तुलनेत ३० पैसे अधिक गाळात गेला. सलग तिसऱ्या सत्रात घसरणातरा रुपया ५५.४१ पर्यंत येऊन गेल्या सहा महिन्याच्या नीचांकापर्यंत आला आहे. भारतीय चलन सोमवारीदेखील ५५.११ पर्यंत घसरताना गेल्या पाच महिन्याच्या तळात रुतले होते. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चलनाने २३ पैशांचे नुकसान सोसत ७ जानेवारी २०१३ नंतरचा सर्वात खालचा स्तर गाठला होता. हाच क्रम मंगळवारीही पहायला मिळाला. सुरुवातीच्या व्यवहारात ५५ च्या आत असलेला रुपया दिवसभरात ५४.८० पर्यंत उंचावला. मात्र सत्रात ५५.४२ पर्यंत घसरत तो दिवसअखेर ५५.४१ वर स्थिरावला. २०१३ मधील स्थानिक चलनाची ही पहिली कमकुवकता असून यापूर्वी २७ नोव्हेंबर २०१२ रोजी रुपया ५५.४५ वर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबपर्यंत रुपया ५७ पर्यंत घसरेल
डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ ची पातळी तोडून चार महिन्याच्या नीचांकावर मंगळवारी बंद झाला आहे. अर्थमंत्र्यांनी कितीही आर्जव करत असले तरी वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ टक्क्यांवर गेली आहे. त्यातच गेल्य दोन महिन्यांपासून रिझव्‍‌र्ह बँक पुन्हा स्थानिक चलनाला स्थैर्य देण्यासाठी डॉलर खरेदी करत आहे. याचा परिणाम रुपयाच्या घसरणीत झाला. डिसेंबपर्यंत रुपया ५७ ची पातळी गाठेल.   
 – दिव्या बजाज, डीबी अ‍ॅडव्हायजर्स प्रा.लि.

वर्षअखेपर्यंत निफ्टी ७,००० वर
अमेरिकन काँग्रेसच्या बुधवारी होणाऱ्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत काहीही निर्णय झाला तरी भांडवली बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम होणे शक्य नाही. सेन्सेक्स व निफ्टी गेल्या ६४ महिन्यानंतर नवा उच्चांक स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी सेन्सेक्सला अद्याप १२ ते १५ टक्क्यांच्या पल्ला गाठायचा आहे. निफ्टी किमान ७,००० चा पल्ला डिसेंबर-जानेवारीपर्यंत गाठेल व यापुढे तेजीचे नेतृत्व बँक व वाहन निर्देशांक करतील.
– ए. के. प्रभाकर, संशोधन प्रमुख, आनंद राठी फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devaluation of rupee
First published on: 22-05-2013 at 12:18 IST