गेल्या काही दिवसांपासून जुन्या नाणी व नोटा खरेदी-विक्रीचा ट्रेंड जोर धरू लागला आहे. अनेकजण ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवरून जुन्या नोटा आणि नाणी विकत आहेत. आरबीआयने नुकतीच याबाबत महत्त्वाची माहिती जारी केली आहे. आरबीआयने सांगितले की, काही फसवे घटक ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी सेंट्रल बँकेचे नाव आणि लोगो वापरत आहेत.

तुम्हीही जुन्या नाणी आणि नोटा विकण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी करत असाल तर आधी आरबीआयने दिलेली ही माहिती नक्की वाचा. ऑनलाइन फसवणूक करणारे सतत ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते रोज नवनवीन मार्ग शोधतात.

importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व

आरबीआयने ट्विट करून काय सांगितले आहे जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “रिझर्व्ह बँकेच्या असे निदर्शनात आले आहे की काही घटक भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगो आणि विविध ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत. तसेच जुन्या नोटा आणि नाणी विकण्यासाठी लोकांकडून फी / कमिशन किंवा कर मागत असतात.

रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या निवेदनात सांगितले आहे की, ‘रिझव्‍‌र्ह बँकेने अशा कोणत्याही कार्यात गुंतलेली नाही आणि अशा व्यवहारांसाठी कधीही कोणाकडूनही शुल्क किंवा कमिशन मागणार नाही. त्याच वेळी, बँकेने असे म्हटले आहे की त्यांनी अशा प्रकारच्या क्रियाप्रकल्पासाठी कोणतीही संस्था किंवा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे अधिकृतता दिलेली नाही.

आरबीआयचा असे कोणतेच व्यवहार करत नाही

आरबीआय अशा प्रकरणांमध्ये व्यवहार करत नाही किंवा कोणाकडूनही अशी फी किंवा कमिशन मागत नाही. यावेळी बँकेने सांगितले की, “भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांवर कोणतेही शुल्क किंवा कमिशन आकारण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही संस्था, कंपनी किंवा व्यक्ती इत्यादींना दिलेला नाही. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया सामान्य जनतेला अशा बनावट आणि फसव्या ऑफर्समध्ये न पडण्याचा सल्ला देते.