पीटीआय, नवी दिल्ली : विद्यमान मे महिन्यात १ ते २१ तारखेदरम्यान देशातून झालेल्या निर्यातीत गत वर्षांच्या तुलनेत २१.१ टक्क्यांची वाढ होऊन, ती २३.७ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलियम उत्पादने आणि विद्युत सामग्रीसारख्या क्षेत्रांच्या सकारात्मक कामगिरीमुळे निर्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत वधारली आहे.

चालू महिन्यातील दुसऱ्या आठवडय़ात म्हणजेच १५ ते २१ मेदरम्यान निर्यातीमध्ये सरस म्हणजे २४ टक्के वाढ होऊन ती ८.०३ अब्ज डॉलरवर गेली आहे. पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी आणि विद्युत सामग्री क्षेत्रातील निर्यात या कालावधीत मागील वर्षांतील याच काळाच्या तुलनेत अनुक्रमे ८१.१ टक्के, १७ टक्के आणि ४४ टक्क्यांनी वधारली आहे.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट

संपूर्ण मे महिन्यातील निर्यातीची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाकडून जून महिन्यात प्रसिद्ध केली जाईल. चालू आर्थिक वर्षांतील प्रथम महिना एप्रिलमध्ये देशातून झालेल्या निर्यातीत गत वर्षांच्या तुलनेत ३०.७ टक्क्यांनी वाढून, ती ४०.१९ अब्ज डॉलरच्या पातळीवर होती. मात्र या कालावधीत आयातही ३०.९७ टक्क्यांनी वाढून ६०.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर १०० डॉलर प्रति पिंप पातळीच्या वर कायम आहेत आणि त्या परिणामी एकूण आयात खर्चामध्येही वाढ होत असून व्यापार तूटदेखील वाढत आहे.