करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था थोड्या काळासाठी खाली आली असताना आता त्यात सातत्याने सुधारणा होत आहे. आता जागतिक वित्तीय सेवा कंपनी गोल्डमॅन सॅचने देखील २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. वॉल स्ट्रीट ब्रोकरेज गोल्डमन सॅचने २०२२ मध्ये भारताचा जीडीपी ९.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२० मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत सात टक्क्यांची मोठी घसरण झाल्यानंतर, गोल्डमन सॅचने २०२१ मध्ये अर्थव्यवस्था आठ टक्के आणि २०२२ मध्ये ९.१ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी, भारताचा आर्थिक विकास दर ३१ मार्च २०२२ पर्यंत ११.१ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०२१-२२ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर ८.५ टक्के असेल असे म्हटले आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये हा दर आणखी ९.१ टक्क्यांपर्यत वाढणार असल्याचे गोल्डमन सॅचने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२१ या आर्थिक वर्षात करोनामुळे जीडीपी मध्ये ७.३ टक्क्यांपर्यंत घट झाली होती. पण २०२१-२२ मध्ये बेस इफेक्टमुळे ती अधिक वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने २०२१-२२ मध्ये जीडीपी ९.५ टक्के वाढीची अपेक्षा केली आहे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर ती ७.८ टक्क्यापर्यंत पर्यंत कमी होईल असे म्हटले आहे.

Web Title: Gdp growth to pick up to 9 point 1 percent in 2022 goldman sachs abn
First published on: 24-11-2021 at 08:52 IST