या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू वर्षांसाठी ७.२ टक्के दर अपेक्षित

भारत या जगातील वेगाने वाढणाऱ्या विकसित देशाची अर्थव्यवस्था २०१७-१८ या चालू वित्त वर्षांत ७.२ टक्के दराने वाढेल, असा विश्वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

जागतिक बँकेने २०१९-२० पर्यंत भारताचा विकास दर ७.७ टक्के असेल, असेही नमूद केले आहे. तर गेल्या आर्थिक वर्षांसाठी हा दर ७.२ टक्के नोंदला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर सर्वात वेगवान अशी भारतीय अर्थव्यवस्था असून देशातील खासगी गुंतवणूक वाढत असल्याचे निरिक्षण जागतिक बँकेने नोंदविले आहे. भारताच्या विकासाबाबत जारी केलेल्या अहवालात जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेग घेत २०१९-२० पर्यंत ७.७ टक्क्य़ांपर्यंत पोहोचेल, असेही नमूद केले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर नोव्हेंबर २०१६ मधील निश्चलनीकरणाचा काहीसा विपरित परिणाम झाला; मात्र चालू वर्षांत चांगल्या मान्सूनच्या रूपात विकास पूर्वपदावर दिसून येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. येऊ घातलेली वस्तू व सेवा कर प्रणाली ही अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देईल, असे जागतिक बँकेने नमूद केले आहे.

Web Title: Gdp growth to remain strong says world bank
First published on: 30-05-2017 at 02:27 IST