दुचाकी वाहननिर्मितीतील आघाडीच्या हिरो इलेक्ट्रिकने तीनचाकी रिक्षा वाहन प्रकारात पदार्पण केले असून ‘राही’ नावाने त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षा तयार केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल यांनी e05ही रिक्षा गुरुवारी नवी दिल्लीत सादर केली. १.१० लाख रुपये किंमत असलेली ही रिक्षा १,००० व्ॉटच्या बॅटरीची असून एकदा चार्ज केल्यावर ती ९० किलोमीटर चालते. यामध्ये प्रवाशांच्या बसण्याच्या जागेत एलईडी दिवे तर चालक बसण्याच्या जागेजवळ मोबाइल चार्जर सुविधा देण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाख इलेक्ट्रिक दुचाकी विकणाऱ्या हिरोने आता दिल्लीसह उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ई-रिक्षा उतरविण्याचा मानस व्यक्त केला आहे.