विदेशातील काळ्या पैशाने चर्चेत आलेल्या एचएसबीसीच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी चौकशीसाठी येऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळच्या ब्रिटनमधील बँकेच्या स्विस शाखेने ठेवीदारांचे खाते हाताळताना करचुकवेगिरी केल्याचा ठपका भारतासह सहा देशांनी ठेवला आहे.
एचएसबीसीचे फोर्ट (हुतात्मा चौक) परिसरात मुख्यालय आहे. तेथे गेल्याच आठवडय़ात मुंबईतील विभागाचे येऊन ठेवीदारांचे खाते तसेच कराबाबतची चौकशी करून गेल्याचे कळते. एचएसबीसीच्या स्विस शाखेने आपल्या खातेदारांना कर बुडविण्यासाठी मदत केल्याचा ठपका भारतीय प्राप्तिकर विभागाने ठेवला आहे. आघाडीच्या अनेक उद्योजकांकडून काळ्या पैशाची तरतूद या बँकेच्या विदेशातील शाखेमध्ये केली गेल्याची चर्चा असतानाच बँकेमागे आता कर चौकशीचा ससेमिरा लागला आहे.