नवी दिल्ली : अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात सरलेल्या मे महिन्यात १३.५ टक्क्यांनी वाढून ९.७९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ही निर्यात ८.६२ अब्ज डॉलर होती. एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीत अभियांत्रिकी निर्यात १६.८४ टक्क्यांनी वाढून १९.३९ अब्ज डॉलर झाली आहे, अशी माहिती अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेने गुरुवारी दिली.

भारताची अमेरिकेला होणारी अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात मे महिन्यात १.११ अब्ज डॉलरवरून वाढून १.८१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६३.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र चीनला होणाऱ्या निर्यातीत घसरण झाली आहे. ती आता ५२ टक्क्यांनी घसरून २१.७४ कोटी डॉलरवर झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ती ४५.१७ कोटी डॉलर होती. जर्मनी, सिंगापूर, ब्रिटन, इटली आणि थायलंड या देशांमधून अभियांत्रिकी वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

भारताच्या अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीपैकी ७५ टक्के महसूल हा २५ विकसित देशांमधून प्राप्त होतो आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपीय महासंघातील देशांकडून होणाऱ्या मागणीमध्ये मासिक आणि तिमाही आधारावर वाढ नोंदवली गेली आहे.

अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढली असली तरी अजूनही ती समाधानकारक पातळीवर पोहोचलेली नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे अजूनही चिंता कायम असून पुरवठय़ाच्या बाजूने समस्या कायम आहे. दुसरीकडे खनिज तेल आणि वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे अनिश्चिततेत भर पडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण निर्यातीस फायदेशीर असली तरी, दीर्घकाळ रुपया कमकुवत राहणे अर्थव्यवस्थेसाठी हानीकारक आहे, असे मत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी नोंदवले.

निर्यातीत टक्का वाढला..

देशाच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा वाटा वाढला असून एप्रिल-मे २०२२ मध्ये एकूण वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीचा वाटा २५.१४ टक्के राहिला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २४.६४ टक्के होता.